नवी दिल्ली : पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात मारूती इको मिनिव्हॅनचा वापर करण्यात आला, ती गाडी जैश ए महंमदच्या दहशतवाद्याने हल्ल्याच्या दहा दिवस आधी विकत घेतली होती, पण या गाडीचा मालक बेपत्ता आहे, असे राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे एनआयएने म्हटले आहे.
जैश ए महंमदचा दहशतवादी सज्जाद बट याने ही गाडी विकत घेतली होती. तो दक्षिण काश्मीरमधील बिजबेहराचा रहिवासी असून तो फरार आहे, हल्ल्याच्या तपासातील हा महत्त्वाचा धागा असल्याचे एनआयएच्या प्रवक्तयाने सांगितले.
हल्ल्यात वापरलेल्या वाहनाचे अवशेष जोडून ती गाडी मारूती इको असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिचा चासिस क्रमांक MA3ERLF1SOO183735 व इंजिन क्रमांक G12BN164140 आहे. ही गाडी २०११ मध्ये अनंतनाग येथील हेवन कॉलनीत राहणाऱ्या महंमद जलील अहमद हकानी याला विकण्यात आली होती, नंतर ती सज्जाद बट याने विकत घेतली. तो शोपियातील सिराज उल उलुमचा विद्यार्थी आहे. सज्जाद बट याने ४ फेब्रुवारीला गाडी विकत घेतली. एनआयएने टाकलेल्या छाप्यात पोलिसांना सज्जाद हाती लागला नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 26, 2019 3:29 am