19 September 2020

News Flash

ऑक्सफर्ड लशीच्या निष्कर्षांचे भारतात तज्ज्ञांकडून स्वागत

अंतिम निकालही असेच सकारात्मक असतील.

संग्रहित छायाचित्र

 

ऑक्सफर्ड विद्यापीठाने करोना विषाणूवर तयार केलेल्या लशीच्या चाचण्यांचे जे निष्कर्ष हाती आले आहेत ते उत्साहवर्धक असून या संस्थेने शास्त्रोक्त पद्धतीने लस विकसित करण्याची प्रक्रिया केली हे महत्त्वाचे आहे, असे काही तज्ज्ञांनी म्हटले आहे. लसीचे अंतिम फलित सकारात्मक असेल असेही मत व्यक्त करण्यात आले आहे.ऑक्सफर्डच्या मानवी चाचण्या अत्यंत पारदर्शक असल्याचे सांगून रोगनिदान तज्ज्ञांनी म्हटले आहे,की त्याचे निकाल  उत्साह वाढवणारे आहेत. अपोलो रुग्णालयाचे डॉ. सुरणजित चटर्जी यांनी सांगितले,की ऑक्सफर्डच्या चाचण्या वैज्ञानिक पातळीवर सरस आहेत. त्यात विश्वासार्हता आहे शिवाय त्या अनेक देशात करण्यात आल्या आहेत. अंतिम निकालही असेच सकारात्मक असतील.

अ‍ॅस्ट्राझेनका व ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्या लशीचे प्राथमिकनिष्कर्ष जाहीर करण्यात आले असून त्यात प्रतिकारशक्ती चांगली वाढलेली दिसून आली आहे. ११०७ लोकांवर हे प्रयोग करण्यात आले होते. डॉ. लाल पॅथॉलॉजी प्रयोगशाळेचे डॉ. अरविंद लाल यांनी सांगितले,की हे प्राथमिक निष्कर्ष सकारात्मक आहेत. त्याचे अंतिम निकालही सकारात्मक च राहतील. शिवाय १८-५५ वयोगटातील लोकांवर चाचण्या घेतल्याने त्यांची व्यापकता मोठी आहे.

नॉइडा येथील पल्मोनॉलॉजी विभागाचे डॉ. मृणाल सरकार यांनी सांगितले,की लशीचे चांगले परिणाम येत आहेत हे खरे असले तरी प्रतिबंधात्मक उपाय सोडून चालणार नाही. लसच साथ थांबवू शकते हे खरे असले तरी सुरक्षितता चाचण्यांपलीकडे गेल्यानंतर आपण यावर काही बोलू शकतो. त्याला काही वर्षे लागू शकतात. लाल यांनी सांगितले,की लस तयार करणे ही मॅरेथॉन स्पर्धाच आहे. ऑक्सफर्ड लशीने पहिला अडथळा ओलांडला आहे. त्याबाबत मी आशावादी आहे , त्यात यश येईल यात शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 12:11 am

Web Title: oxford vaccine findings welcomed by experts in india abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 सिरमच्या ५० टक्के लसी भारतीयांसाठी! लोकांना त्या विकत घ्याव्या लागणार नाहीत, अदर पूनावालांचा दावा
2 काँग्रेस जेवढी मागे जाईल, तेवढाच देश पुढे जाईल – बबिता फोगाट
3 देशविरोधी वक्तव्य करणारा शरजील इमाम करोना पॉझिटिव्ह
Just Now!
X