उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ऑक्सिजन भरत असताना सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात एकजण ठार झाला आहे. कानपूर शहरातील पंखी ऑक्सिजन प्लांटमध्ये ही घटना घडली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली.

देशात करोना रुग्णांसाठी ऑक्सिजन आवश्यक बाब बनली असून, सर्वच ठिकाणी सुरळीतपणे पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. अनेक खासगी ऑक्सिजन प्लांटही शासनाने ताब्यात घेतले असून, तिथूनही पुरवठा केला जात आहे. अशातच कानपूरमधील एका ऑक्सिजन सिलेंडर प्लांटमध्ये दुर्दैवी घटना घडली.

कानपूर शहरात (उत्तर प्रदेश) असलेल्या पंखी ऑक्सिजन प्लांटमध्ये सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरण्याचं काम सुरू होतं. ऑक्सिजन भरला जात असताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात एक जण जागीच ठार जाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी स्फोट झालेल्या ऑक्सिजन प्लांटला भेट दिली. जखमी असलेल्या दोघांच्या प्रकृतीबद्दल अद्याप माहिती मिळू शकली नाही.