देशात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे दररोज शेकडो रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह अनेक राज्यांत ऑक्सिजनअभावी रुग्णांचे मृत्यू होत असल्याच्या घटना घडत आहेत. तर दुसरीकडे देशात ऑक्सिजनचा तुटवडा नसून, मुबलकप्रमाणात उपलब्ध असल्याचा दावा मोदी सरकारकडून वारंवार केला जात आहे. या मुद्द्यावरून भाजपाचे नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला सुनावलं आहे.

देशात निर्माण झालेल्या ऑक्सिजन तुटवड्यामुळे दररोज रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत आहे. राजधानी दिल्लीत ऑक्सिजनअभावी रुग्णांचे प्राण जात असल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे. तर कर्नाटक, आंध्र प्रदेशातही अशाच घटना सोमवारी घडल्या. या घटनांनंतर भाजपाचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

Former Governor D Subbarao
आरबीआयचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी केंद्र सरकारला दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले, “श्वेतपत्रिका…”
Eknath Shinde, Eknath Shinde group
सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडत शिंदे गटाचा प्रचार
Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : त्रासाची जबाबदारी स्वीकारली नाही

आणखी वाचा- “हा देश नेमकं कोण चालवतंय माहिती नाही,” ऑक्सिजनअभावी होणाऱ्या मृत्यूंवरुन डॉक्टरांचा संताप

स्वामी यांनी ऑक्सिजन टंचाईच्या मुद्द्यावरून एक ट्विट केलं आणि सरकारला संसदेच्या स्थायी समितीने दिलेल्या इशाऱ्याची आठवण करून दिली. “देशात किती ऑक्सिजन उपलब्ध आहे, हे सांगणं सरकारनं बंद करावं. पण, आम्हाला हे सांगावं की, किती जणांना ऑक्सिजन देण्यात आला आणि कोणत्या रुग्णालयांना देण्यात आला? ऑक्टोबर २०२०मध्ये संसदेच्या आरोग्यविषयक स्थायी समितीने ऑक्सिजन सिलेंडर उत्पादन आणि पुरवठ्याचा तुटवडा असल्याचा इशारा दिला होता. पण, तरीही सरकार त्रस्त झालं नाही,” असं म्हणत स्वामी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.

आणखी वाचा- “लॉकडाउन हा एकमेव पर्याय….पण हे सरकारला कळतच नाहीये”- राहुल गांधी

देशात २ मे रोजी करोनामुळे ३४१७ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या दोन लाख १८ हजार ९५९ वर पोहोचली. करोनातून आतापर्यंत एक कोटी ६२ लाख ९३ हजार ००३ जण बरे झाले असून मृत्युदर १.१० टक्के इतका आहे. गेल्या २४ तासात ३४१७ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील ६६९ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण दोन लाख १८ हजार ९५९ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील ७० हजार २८४ जणांचा समावेश आहे.