02 March 2021

News Flash

एअरसेल-मॅक्सिस प्रकरणी चिदंबरम यांच्या भूमिकेचा तपास सुरू-सीबीआय

हा व्यवहार ६०० कोटींपेक्षा अधिक रकमेचा होता.

पी. चिदंबरम

एअरसेल-मॅक्सिस व्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम यांच्या भूमिकेचा तपास करण्यात येत असल्याचे केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने सोमवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. २००६ मध्ये मलेशियन कंपनी मॅक्सिसद्वारे एअरसेलमध्ये १०० टक्के हिस्सेदारी मिळवण्यासाठी परवानगी देण्यावरून चिदंबरम यांच्यावर नियमांचे पालन न केल्याचा आरोप आहे.
भाजप नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यानंतर सरकारकडून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हे उत्तर न्यायालयाला दिले. याप्रकरणी चिदंबरम यांच्या भूमिकेची चौकशी व्हावी, अशी मागणी स्वामी हे करत आहेत. नियमानुसार हा व्यवहार झाला नसल्याचा दावा करण्यात आला आहे. विदेशी गुंतवणुकीसंबंधीत प्रस्ताव आर्थिक प्रकरणाच्या कॅबिनेट समितीच्या मंजुरीसाठी पाठवणे आवश्यक असते. परंतु, या प्रकरणात असं झालेलं नाही. हा व्यवहार ६०० कोटींपेक्षा अधिक रकमेचा होता. सीबीआयने ही माहिती स्वामींनी गेल्या महिन्यात पाठवलेल्या पत्राच्या उत्तरादाखल दिल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले. अमलबजावणी संचालनालयाचा तपास अहवालही न्यायालयाला मेहता यांनी या वेळी दिला.

तुमच्या याचिकेवर नोटीस जारी करणे मोठी बाब नाही. आम्ही सर्वात खालच्या माणसापासून ते सर्वोच्च पदावरील व्यक्तीसही नोटीस पाठवू शकतो. मात्र, असं आम्ही तेव्हाच करतो जेव्हा आम्ही संपूर्णपणे संतुष्ट होऊ आणि किमान प्राथमिक दृष्टया त्या व्यक्तीचा त्या प्रकरणात सहभाग आहे, याचे पुरावे आढळल्यानंतर, असे १० फेब्रुवारीस मुख्य न्यायमुर्ती जे. एस. केहर यांच्या अध्यक्षतेखालील बेंचने १० फेब्रुवारीस म्हटले होते. यावर स्वामींनी आपण सर्व पुरावे सादर करू असे म्हटले होते.
मेहता यांनी सीबीआयकडून न्यायालयाच्या समोर उपस्थित झाले. त्यांनी तपासास वेळ लागेल असे सांगितले. यावर स्वामींनी तपास यंत्रणांनी नियमितपणे ठराविक तपास अहवाल न्यायालयाला सादर करण्याचे निर्देश देण्याची विनंती केली. परंतु, न्या. केहर यांनी हे योग्य नसल्याचे म्हटले. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करण्यास २ मेपर्यंत पुढे ढकलली आहे.
एअरसेल-मॅक्सिस व्यवहारात मारन बंधूंना निर्दोष मुक्त करण्यात आले होते. या प्रकरणी तत्कालीन दूरसंचार मंत्री दयानिधी मारन यांच्यावर आरोप होता की, त्यांनी एअरसेलचे व मॅक्सिस कंपनीला हिस्सेदारी विकण्याचा व्यवहार केला होता. या व्यवहाराबदलात मारन यांच्या टेलिव्हिजन कंपनीत मोठी गुंतवणूक करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 10:08 am

Web Title: p chidambaram investigating in aircel maxis case cbi says to supreme court
Next Stories
1 हिंदूंसाठी मुस्लिमांनी गोमांस खाणे बंद करावे: अजमेर शरीफ दर्ग्याचे धर्मगुरु
2 मतदान यंत्रातील फेरफार सिद्ध करा, निवडणूक आयोग देणार ‘ओपन चॅलेंज’
3 आता आरबीआय आणणार २०० रूपयांची नवी नोट ?
Just Now!
X