News Flash

संघ कार्यकर्त्यांच्या खुनाच्या कटाचे माकप नेते पी. जयराजन मुख्य सूत्रधार

केरळच्या कन्नूर जिल्ह्य़ात तीन वर्षांपूर्वी झालेल्या एका संघ कार्यकर्त्यांच्या भीषण खुनाच्या ‘कटाचा मुख्य सूत्रधार’ सीबीआयने माकपचे नेते पी. जयराजन यांना ठरवले असून, ‘दहशतवादी कृत्य’ असलेल्या

| September 1, 2017 12:36 am

केरळच्या कन्नूर जिल्ह्य़ात तीन वर्षांपूर्वी झालेल्या एका संघ कार्यकर्त्यांच्या भीषण खुनाच्या ‘कटाचा मुख्य सूत्रधार’ सीबीआयने माकपचे नेते पी. जयराजन यांना ठरवले असून, ‘दहशतवादी कृत्य’ असलेल्या या खुनासाठी त्यांच्याविरुद्ध कठोर अशा यूएपीए कायद्याखाली आरोप ठेवले आहेत.

१ सप्टेंबर २०१४ रोजी करण्यात आलेली हत्या हा ‘सुनियोजित पद्धतीने रचलेला, आखलेला आणि सुसंघटित राजकीय खून’ होता, असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयच्या तिरुवनंतपुरम कार्यालयाच्या विशेष गुन्हे शाखेने एर्नाकुलमच्या विशेष न्यायाधीशांसमोर दाखल केलेल्या पुरवणी अंतिम अहवालात म्हटले आहे.

रा.स्व. संघाचा पदाधिकारी असलेला ई. मनोज याचा भीषण खून हे ‘दहशतवादी कृत्य’ होते, असे सांगून सीबीआयने बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या (यूएपीए अ‍ॅक्ट) कलम १८ व १९ अन्वये जयराजन यांच्यावर आरोप ठेवले. गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचण्यासह भादंविच्या इतर कलमांन्वयेही त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

कटाचे मुख्य सूत्रधार असलेल्या जयराजन यांच्यावर सुमारे दोन दशकांपूर्वी झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी जयराजन यांनी आरोपी क्र. १ विक्रमन याच्यासोबत गुन्हेगारी कारस्थान रचले आणि व्यावसायिक हल्लेखोर, प्राणघातक शस्त्रे व बाँब यांचा वापर करून मनोजचा खून केला. कन्नूरमधील इतर संघ कार्यकर्त्यांना संदेश देणे व कन्नूरमध्ये दहशत पसरवणे हा याचा उद्देश होता, असा आरोप सीबीआयने आपल्या अहवालात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 12:36 am

Web Title: p jayarajan rss activist murder case
Next Stories
1 घटनेतील कलम ३७० व ३५ अ तात्काळ रद्द करण्याची ‘पनून’ची मागणी
2 ‘मुस्लिम असल्यामुळेच मोदी सरकारकडून माझा छळ’
3 सुनील अरोरा मुख्य निवडणूक आयुक्त तर राजीव महर्षी यांची कॅगच्या प्रमुखपदी नियुक्ती
Just Now!
X