देशातील प्रतिष्ठेच्या पद्म पुरस्कारांसाठी यंदा आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर, अभिनेता रजनीकांत, अनुपम खेर, अजय देवगण, अभिनेत्री प्रियांका चोप्रा, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, क्रीडापटू सानिया मिर्झा, सायना नेहवाल यांची निवड करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. मनोरंजन, कला, क्रीडा, राजकारण, अर्थकारण, समाजकारण, परराष्ट्र संबंध आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांना यंदा या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन प्रकारांमध्ये हे पुरस्कार दिले जातात.

पद्मविभूषण

रजनीकांत
रामोजी राव
जगमोहन
श्री श्री रविशंकर
धीरूभाई अंबानी (मरणोत्तर)

पद्मभूषण
विनोद राय
अनुपम खेर
उदीत नारायण

पद्मश्री
सायना नेहवाल<br />सानिया मिर्झा
उज्ज्वल निकम
अजय देवगण<br />प्रियांका चोप्रा<br />रॉबर्ट डी ब्लॅकविल
इंदू जैन