News Flash

स्वर्गीय सूर हरपला! पद्मविभूषण पंडित जसराज यांचं निधन

भारतीय संगीतातलं विद्यापीठ हरवल्याची भावना

पद्मविभूषण पंडित जसराज यांचं निधन झाल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. न्यू जर्सी येथे त्यांचं निधन झालं. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंडित जसराज भारतीय शास्त्रीय संगीत पद्धतीतील मेवाती घराण्याचे गायक होते. भारत सरकारने २००० मध्ये संगीत क्षेत्रातल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौवरले होते. पंडित जसराज हे मूळचे तबलजी होते. गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे समजल्याने त्यांनी तबला वादन सोडून गायक बनायचे ठरवले. त्यांचे मोठे बंधू मणिरामजी यांनी त्यांना गाणे शिकवले. भारतीय संगीतातला एक स्वर्गीय सूर हरपला अशीच भावना संगीत रसिकांच्या मनात आहे.

पंडित जसराज यांचा जन्म २८ जानेवारी १९३० रोजी झाला होता. पंडित जसराज हे गेल्या ८० वर्षांपासून जास्त काळ संगीत क्षेत्रात कार्यरत होते. संगीत क्षेत्रातल्या अनेक प्रमुख पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते. मेवाती घराण्यातील गायकी असलेल्या पंडित जसराज यांच्या निधनाने शास्त्रीय संगीत गायन क्षेत्रावर मोठी शोककळा पसरली आहे.

पंडित जसराज यांच्या नावाने ग्रह
शास्त्रीय गायनाने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या पंडित जसराज यांच्या नावाने एक ग्रहही अंतराळात आहे. आंतरराष्ट्रीय खगोल संघाने मंगळ आणि गुरु या दोन ग्रहांच्या मधे असलेल्या एका ग्रहाचे नाव पंडित जसराज असे ठेवले आहे. हा बहुमान मिळालेले ते पहिले भारतीय कलावंत ठरले. मंगळ आणि गुरु यांच्या मधे असलेला एक लहान ग्रह २००६ व्हिडी ३२ असा आहे. या ग्रहाचा शोध २००६ मध्ये लागला होता. या ग्रहाला पंडित जसराज यांचं नाव देण्यात आलं.

पंडित जसराज यांना मिळालेले पुरस्कार

पद्मश्री पुरस्कार
संगीत अकदामी पुरस्कार
पद्मविभूषण
पु.ल. देशपांडे जीवन गौरव पुरस्कार
भारतरत्न भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार
गंगुबाई हनगल जीवनगौरव पुरस्कार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2020 6:40 pm

Web Title: padma vibhushan pandit jasraj passes away in new jersey us at the age of 90 scj 81
Next Stories
1 ३२ वर्षाच्या सबरीना सिंह अमेरिकेतील उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या प्रेस सचिव
2 बॉलिवूडमधील महाराष्ट्राचा चेहरा हरपला! दिग्दर्शक निशिकांत कामत काळाच्या पडद्याआड
3 बारामुल्लातील दहशतवादी हल्ल्याचा वचपा; लष्कर ए तोयबाचा टॉपचा कमांडर सज्जाद ठार
Just Now!
X