‘कॉम्बिफ्लाम’ या पेनकिलरचा साठा निकृष्ट दर्जाचा असल्याचे औषध नियंत्रकांना आढळल्यानंतर या औषधाची उत्पादक कंपनी ‘सनोफी’ने त्याच्या चार बॅचेस भारतातून परत मागवल्या आहेत.
विघटन चाचणीत अपयशी ठरलेल्या कॉम्बिफ्लामच्या या बॅचेस ‘मानक दर्जाच्या’ नसल्याचे सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ)ला आढळल्यानंतर कंपनीने हे पाऊल उचलले आहे. या संदर्भात संपर्क साधला असता सनोफी इंडियाच्या प्रवक्त्याने पीटीआयला सांगितले, की कॉम्बिफ्लाम गोळ्यांच्या काही बॅचेसला विघटनासाठी उशीर लागत असल्याचे आढळले.