News Flash

पूंछमध्ये सहा छावण्यावर पाककडून गोळीबार

पाकिस्तानकडून पुन्हा एकदा नियंत्रणरेषेजवळच्या भारतीय छावण्यांवर रविवारी रात्री गोळीबार करण्यात आला.

| September 16, 2013 02:05 am

पाकिस्तानकडून पुन्हा एकदा नियंत्रणरेषेजवळच्या भारतीय छावण्यांवर रविवारी रात्री गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय छावण्यांवर गोळीबार करण्यात येतो आहे. 
पूंछ जिल्ह्यातील मंडी आणि गार्ही या दोन ठिकाणी असलेल्या छावण्यांवर रविवारी मध्यरात्रीनंतर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. भारतीय जवानांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानकडून छोट्या आणि स्वयंचलित अग्निगोळ्यातून गोळीबार करण्यात येत होता, अशी माहिती लष्कराचे प्रवक्ते एस. एन. आचार्य यांनी दिली.
रविवारी मध्यरात्री सुरू झालेला गोळीबार सोमवारी पहाटे पावणेचार वाजेपर्यंत सुरू होता. पावणेचारच्या सुमारास पाकिस्तानकडून सुरू असलेला गोळीबार थांबला. या गोळीबारामध्ये कोणताही भारतीय जवान जखमी झालेला नसल्याचे आचार्य यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2013 2:05 am

Web Title: pak army fires at six indian forward posts
टॅग : Firing On Loc
Next Stories
1 मनधरणी सुरूच!
2 नरेंद्र मोदींचे भाषण लाईव्‍ह ऐकण्‍यासाठी डायल करा हा नंबर
3 काळे झेंडे दाखवून अखिलेश यादवांचे स्वागत!
Just Now!
X