News Flash

काश्मीरमध्ये नियंत्रणरेषेवर तणाव कायम; पूंछमध्ये पुन्हा गोळीबार

पूंछमध्ये नियंत्रणरेषेवरील छावण्यांवर गोळीबार करून पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले.

| October 29, 2013 12:56 pm

पूंछमध्ये नियंत्रणरेषेवरील छावण्यांवर गोळीबार करून पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले.
पूंछ विभागातील गंभीर भागातील नियंत्रणरेषेवर मंगळवारी सकाळी सव्वा पाचच्या सुमारास पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. स्वयंचलित अग्निशस्त्रे आणि छोटी शस्त्रे यामधून भारतीय छावण्यांवर गोळीबार करण्यात येऊ लागला, अशी माहिती लष्कराचे प्रवक्ते कर्नल आर. के. पाल्टा यांनी दिली. भारतीय जवानांनी तातडीने पाकिस्तानच्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानकडून सकाळी सात वाजेपर्यंत गोळीबार करण्यात येत होता. गोळीबारामध्ये कोणीही जखमी झाले नसल्याचे प्रवक्त्याने स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2013 12:56 pm

Web Title: pak army violates ceasefire fires on forward areas
टॅग : Firing On Loc
Next Stories
1 ‘सुशीलकुमार शिंदेंना पाटणा स्फोटांपलीकडेही आयुष्य आहे’
2 निकालपत्रात सुधारणेसाठी सहारा समूहाची पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव
3 मोदींकडे कल्पनांचा अभाव -दिग्विजय
Just Now!
X