02 December 2020

News Flash

अफगाणी नागरिक अपहरण खटल्यात लख्वीला जामीन मंजूर

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार लख्वी याला पाकिस्तानातील न्यायालयाने अफगाणिस्तानच्या नागरिकाच्या अपहरणप्रकरणी जामीन मंजूर केला.

| January 10, 2015 01:46 am

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार लख्वी याला पाकिस्तानातील न्यायालयाने अफगाणिस्तानच्या नागरिकाच्या अपहरणप्रकरणी जामीन मंजूर केला.
तथापि, अन्य न्यायालयाने त्याच्या जामिनाबद्दल निर्णय देईपर्यंत लख्वीला रावळपिंडीतील अदियाला कारागृहातच राहावे लागणार आहे. इस्लामाबादमधील कनिष्ठ न्यायालयाने अफगाणिस्तानातील नागरिक अन्वर खान याच्या अपहरण खटल्यात जामीन मंजूर केला. त्यासाठी लख्वीकडून दोन लाख रुपयांची हमी घेण्यात आली असल्याचे त्याचे वकील राजा रिझवान अब्बासी यांनी सांगितले.
लख्वीला कारागृहातच ठेवण्याचा सरकारने दिलेला आदेश इस्लामाबाद उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविल्याने कोणत्याही प्रकारे लख्वीला कारागृहातच डांबून ठेवण्यासाठी पोलिसांनी अन्वर खान या अफगाणिस्तानच्या नागरिकाच्या अपहरणाचा कट रचला, असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला.
लख्वीला जामीन मिळाल्याचे तीव्र पडसाद भारतात उमटले आणि भारताच्या दबावावरून लख्वी याच्याविरुद्ध खोटा गुन्हा नोंदविण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलली, असा दावाही वकिलांनी न्यायालयात केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 1:46 am

Web Title: pak court grants bail to mumbai terror attack accused lakhvi
Next Stories
1 शरीफ यांच्या पक्षाच्या नेत्यांवर हल्ले चढवा
2 ‘काचमणी’ कलेला भौगोलिक ओळख
3 पुष्कर मृत्यू प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा – थरूर
Just Now!
X