12 July 2020

News Flash

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे दुसऱ्यांदा उल्लंघन

पाकिस्तानी सैनिकांनी गेल्या ४८ तासांत जम्मू-काश्मीरमध्ये दुसऱ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.

| August 11, 2014 12:30 pm

पाकिस्तानी सैनिकांनी गेल्या ४८ तासांत जम्मू-काश्मीरमध्ये दुसऱ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले. या भागात पाकिस्तानी सैन्याने भारतीय चौक्यांच्या दिशेने बेछूट गोळीबार केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्ट. कर्नल मनीष मेहता यांनी दिली.
मेढर क्षेत्रात सकाळी पाकिस्तानी सैनिकांनी लहान आणि स्वयंचलित शस्त्रांच्या सहाय्याने गोळीबार केला. भारताच्या फौजांनी त्यास तसेच चोख प्रत्युत्तर दिल्याचे मेहता यांनी सांगितले. याआधी शनिवारीही पाकिस्तानच्या सैनिकांनी पूँछ भागात गोळीबार केला होता, असे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2014 12:30 pm

Web Title: pak fires at loc posts again second ceasefire violation in 48 hrs
टॅग Pakistan
Next Stories
1 माजी केंद्रीय मंत्री शैलजा यांच्या निवासस्थानी आढळला मृतदेह
2 १०० कोटी खर्चूनही दशतवाद्यांचा माग काढण्यात गुप्तचर यंत्रणा अपयशी
3 लालू-नितीश यांच्यात ‘ऐक्य’ ; भाजपशी लढण्याचा निर्धार
Just Now!
X