16 January 2021

News Flash

पाकिस्तानने सर्वांना फसवलं; २६/११ चा मास्टरमाइंड हाफिज सईदला गुपचूप तुरुंगातून हलवलं घरात

घरात बसून चालवतोय दहशतवादी संघटना....

मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण होत असतानाच, पुन्हा एकदा पाकिस्तानचा खोटेपणा समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयानं हाफिज सईदला दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. खरंतर हाफीज सईद आता तुरुंगात असायला हवा होता. पण तो लाहोरमधल्या जोहर टाऊनमधल्या घरातून दहशतवादी संघटना चालवत आहे. या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांच्या हवाल्याने हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

हाफिज सईद १२ वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मुख्य मास्टरमाइंड आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात त्याला १० वर्ष सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्याआधी हाफिजला जुलै २०१९ मध्ये अटक करण्यात आली. मागच्या आठवडयात आणखी दोन प्रकरणात हाफिजला शिक्षा सुनावण्यात आली.

इम्रान खान सरकारने दहशतवादाला रोखण्याच्या हेतूने हाफिज सईदला अटक आणि शिक्षा केली नाही, तर FATF च्या ब्लॅक लिस्टमधून स्वत:ची सुटका करुन घेणे, हा त्यामागे उद्देश होता. पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच ढासळलेली आहे. FATF मुळे आणखी आर्थिक निर्बंध परवडणारे नाहीत. त्यामुळे जगाला दाखवण्यासाठी पाकिस्तानने हाफिज सईदवर कारवाई केली होती.

इंटेलिजन्समधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हाफिज सईद लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात नाहीय, तर तो घरामध्येच एका सुरक्षित कस्टडीमध्ये आहे, जिथे तो पाहुण्यांना सहज भेटू शकतो. मागच्या महिन्यात लश्कर ए तोयबाच्या जिहाद विंगचा प्रमुख झाकी-उर-रहमान लखवीने घरी जाऊन सईदची भेट घेतली. पैसा जमवण्याबद्दल या बैठकीत चर्चा झाली. हाफिज प्रमाणे लखवी सुद्धा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने घोषित केलेला दहशतवादी आहे. मुंबई २६/११ हल्ल्यात त्याचा सुद्धा महत्त्वाचा रोल होता. पण लखवी सुद्धा पाकिस्तानात मोकाट फिरत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2020 4:19 pm

Web Title: pak has quietly moved mumbai attacks accused hafiz saeed out of jail he is home dmp 82
Next Stories
1 काश्मीरमध्ये लष्कराच्या जवानांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; दोन जवान शहीद
2 लाच घेण्यात भारत आशिया खंडात अव्वल
3 भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
Just Now!
X