News Flash

‘पाकिस्तानने आधी स्वत:चे पहावे’

पाकिस्तानने काश्मीरची काळजी करण्याचे सोडून आधी स्वत:च्या घराची नीट व्यवस्था लावावी

पाकिस्तानने काश्मीरची काळजी करण्याचे सोडून आधी स्वत:च्या घराची नीट व्यवस्था लावावी, असा सल्ला भाजपच्या काश्मीर शाखेने दिला आहे.

पाकिस्तान एक देश म्हणून विभागलेला आहे. बॉम्बस्फोट, गोळीबार आणि वांशिक हिंसाचाराच्या घटना तेथे रोजच्याच झाल्या आहेत. अलीकडच्या वर्षांमध्ये पाकमधील वांशिक हिंसाचारात हजारो निष्पाप लोक मारले गेले आहेत. दहशतवादी त्या देशात समांतर सरकार चालवत आहेत. तथाकथित लोकप्रतिनिधी तर त्यांच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या तालावर नाचणाऱ्या बाहुल्यांपेक्षा वेगळे नाहीत, असे भाजपचे प्रवक्ते खालिद जहांगीर यांनी एका निवेदनात
सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2015 12:04 am

Web Title: pak must do self evaluation
टॅग : Pakistan
Next Stories
1 व्हिडिओ: लालूप्रसाद यांच्यावर प्रचारसभा मंडपातील पंखा कोसळला
2 झकरबर्ग भारत भेटीवर, विद्यार्थ्यांशी संवाद साधणार
3 गुलाम अली हवालाने पैसा ट्रान्सफर करतात- पंकज उधास
Just Now!
X