News Flash

पाकिस्तानला ११ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा

पाकिस्तानच्या आजारी अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी पाकिस्तानने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश मिळू लागले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह (आयएमएफ) अन्य आंतरराष्ट्रीय देणगीदार संस्थांकडून पाकिस्तानला ११ अब्ज डॉलरचे कर्ज

| July 2, 2013 06:20 am

पाकिस्तानच्या आजारी अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी पाकिस्तानने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश मिळू लागले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह (आयएमएफ) अन्य आंतरराष्ट्रीय देणगीदार संस्थांकडून पाकिस्तानला ११ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांची जेफ्री फ्रँक यांच्या नेतृत्वाखालील नाणेनिधीच्या पथकाशी चर्चा झाली. तेव्हा ५.४ अब्ज डॉलरचे कर्ज देण्याबाबत दोन्ही बाजूंमध्ये सहमती झाली, असे ‘द डॉन’ने म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह पाकिस्तानला जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेकडून ५.६ अब्ज डॉलरचे कर्ज मिळणार असून जपान, अमेरिका आणि ब्रिटनकडूनही मदत मिळणार आहे. नाणेनिधीसमवेत करार झाल्यानंतर देणगीदार बँका आणि अन्य देशांकडून पाकिस्तानला अतिरिक्त मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. पाकिस्तानला एकूण ११ अब्ज डॉलरचे कर्ज मिळणार आहे.
वित्तीय तूट आठ टक्क्य़ांवरून ४.५ टक्क्य़ांवर आणणे, विजेची दरवाढ करणे, सबसिडी रद्द करणे, करप्रणालीत वाढ करणे आणि खासगीकरणाला सुरुवात करणे आदी अटी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने घातल्या असून त्यांची पूर्तता पाकिस्तानला करावी लागणार आहे.
यापैकी काही अटींची पूर्तता केल्यास महागाई वाढणार असून बेरोजगारीतही वाढ होणार आहे. मात्र देशाची खिळखिळी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पाकिस्तानला हे पाऊल उचलणे भाग पडणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 6:20 am

Web Title: pak seeks usd 11 billion bailout package from imf donors
टॅग : Pakistan
Next Stories
1 इंडोनेशियाला भूकंपाचा तडाखा, ५० जखमी
2 उत्तराखंडमधील बचावकार्य संपुष्टात; एक लाख १० हजार लोकांची सुटका
3 झारखंडमध्ये नक्षल्यांच्या हल्ल्यात अधीक्षकांसह पाच पोलिस शहीद
Just Now!
X