01 March 2021

News Flash

लष्कराची ‘पोलखोल’ महागात , पाकिस्तानात ‘GEO न्यूज’ वर बंदी

सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण पोहोचलं असून अजूनही चॅनल 'ऑन एअर' करण्यात आलेलं नाही. पाकिस्तानातील जवळपास 80 टक्के परिसरात चॅनलचं प्रसारण बंद...

पाकिस्तानच्या मुख्य न्यूज चॅनल्सपैकी एक असलेल्या ‘GEO न्यूज’ला काही दिवसांपासून ‘ब्लॅक आउट’चा सामना करावा लागत आहे. सरकार आणि सैन्याच्या विरोधात बातम्या दाखवल्याने ही कारवाई केली असल्याची माहिती आहे.सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण पोहोचलं असून अजूनही चॅनल ‘ऑन एअर’ करण्यात आलेलं नाही. पाकिस्तानातील जवळपास 80 टक्के परिसरात चॅनलचं प्रसारण बंद करण्यात आलं आहे अशी कबुली नेटवर्कच्या मुख्य संपादकांनी द न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत दिली. अशाप्रकारचं पाऊल म्हणजे मीडियावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न असल्याचं  द न्यूयॉर्क टाइम्सने म्हटलं आहे. अद्याप पाकिस्तानच्या लष्कराकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लष्काराच्या छावणी असलेल्या परिसरात सर्वप्रथम चॅनल ऑफ एअर करण्यात आलं, त्यानंतर लष्कराचं कंट्रोल असलेल्या क्षेत्रांमध्ये चॅनलचं प्रसारण बंद झालं. यानंतर अन्य परिसरातही केबल ऑपरेटर्सनी चॅनल बंद करण्यास सुरूवात केली.

स्थानिक मीडियानुसार, सरकारविरोधी बातम्या दाखवल्याने जियो टीव्ही आणि सरकारमधील संबंध गेल्या काही दिवसांपासून ताणलेले होते. पाकिस्तानचं लष्कर देखील चॅनलवर नाराज होतं. कारण चॅनलने अनेकदा दहशतवाद्यांबाबत लष्कराची भूमिका आणि परराष्ट्र नितीवर टीका केली होती. त्यानंतर चॅनल ऑफएअर होण्यास सुरूवात झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2018 9:58 am

Web Title: pakistan army ban on geo news
Next Stories
1 महात्मा गांधींचे मारेकरी देशात भयावह वातावरण तयार करतायेत : ओवेसी
2 मध्य प्रदेशात हार्दिक पटेलवर फेकली शाई, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
3 फेकन्युज : तो ‘संवाद’च बनावटी
Just Now!
X