08 July 2020

News Flash

नवाझ शरीफ पाकिस्तानी सैन्यदलाचे बोलके बाहुले?

पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यासोबतचा फोटो काहीही न सांगता खूप काही सांगून जातो आहे. नवाझ शरीफ हे पाकिस्तानी सैन्याचे ऐकल्याशिवाय मन की बातही ठेवता आली नाही याचीच

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ इस्लामाबाद मधे बसलेले असोत किंवा इतर कुठेही…पाकिस्तानी सैन्यदलाची सावली त्यांची पाठ सोडत नाही. कझाकिस्तानच्या अस्तानामध्येही हेच चित्र बघायला मिळाले. शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी नवाझ शरीफ अस्तानात आहेत. नवाझ शरीफ SCO च्या शिखर परिषदेत बोलण्याआधी पाकिस्तानी सैन्य दलाचा अधिकारी त्यांच्याजवळ आला, त्याने काही गोष्टी शरीफ यांच्या कानात सांगितल्या. शरीफ यांनी त्या सगळ्या लक्षपूर्वक ऐकल्या. त्यानंतर तो अधिकारी तिथून निघून गेला आणि मग नवाझ शरीफ बोलण्यासाठी उभे राहिले.

पाकिस्तानचे पंतप्रधान अशा परिषदांमध्ये स्वतंत्रपणे बोलण्याऐवजी फक्त सैन्यदलाचे ऐकूनच बोलतात का? नवाझ शरीफ हे पाकिस्तानी सैन्यदलाचे बोलके बाहुले आहेत का? अशा प्रश्नांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे. तसेच नवाझ शरीफ आंतरराष्ट्रीय मंचावरही पाकिस्तानच्या सैन्यदलाचीच भाषा बोलत आहेत का? त्यांना मन की बात समोर मांडण्याची मुभा नाहीये का? असेही प्रश्न राजकीय जाणकार विचारत आहेत. त्यांचा सैन्यदलाच्या अधिकाऱ्यासोबत प्रसिद्ध झालेला फोटोच सगळे काही सांगून जातो आहे.

आजपासूनच भारत आणि पाकिस्तान हे देश एससीओचे सदस्य असतील. रशियाने एससीओमध्ये भारताचा सहभाग हवा यासाठी आग्रह धरला होता. चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. एससीओचे सदस्यपद मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद हा अखंड मानवतेचा शत्रू असल्याचे वक्तव्य केले. मात्र नवाझ शरीफ यांचा सैन्यदलाच्या अधिकाऱ्यासोबतचा फोटो म्हणजे ते पाकिस्तानी सैन्याच्या दबावाखाली आहेत हे दाखवणारा होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2017 7:49 pm

Web Title: pakistan army dictating the pm nawaz sharif at sco summit
Next Stories
1 शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात मोदी सरकार अपयशी, आरएसएस संबंधित संघटनेचा घरचा आहेर
2 शिवराजसिंह चौहान उद्यापासून अनिश्चित काळासाठी उपोषण करणार
3 जेम्स कोमी फितुर! खात्रीच नव्हे ठाम विश्वास-ट्रम्प
Just Now!
X