हुर्रियतला चर्चेच्या प्रक्रियेतून वगळणार; सुरक्षा सल्लागार जानजुआ यांची महत्त्वाची भूमिका
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे समपदस्थ नवाझ शरीफ यांची लाहोर येथे जी भेट झाली त्यात अप्रत्यक्षपणे पाकिस्तानी लष्कराची मदत होती, असे आता स्पष्ट झाले आहे. भारताशी थांबलेला संवाद पुढे नेण्यासाठी लष्करानेही साथ देण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानात सरकारमध्ये लष्कराचा हस्तक्षेप नेहमीच जास्त असल्याने त्यांच्या आशीर्वादाशिवाय अशी भेट होणे अवघड होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक शुक्रवारी नवाझ शरीफ यांची भेट घेतली आणि त्यामुळे दोन देशांमधील वाटाघाटी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. गेली ६५ वष्रे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील परंपरागत शत्रुत्व मिटवण्याच्या दिशेने प्रयत्न केले जात आहेत.
मोदी आणि शरीफ यांची भेट शरीफ यांच्या वाढदिवसाच्या दिवशी काही तास अगोदर ठरली, पण मोदी लाहोरला पोहोचण्यापूर्वी सुषमा स्वराज यांच्या पाकिस्तान भेटीने दोन्ही देशातील चच्रेची वाट मोकळी झाली होती. जानेवारीच्या मध्यावधीत सचिव पातळीवरील चर्चा इस्लामाबाद येथे घेण्याचे शुक्रवारी मोदी आणि शरीफ यांनी ठरवले असून त्यात हुíरयतचा सहभाग येऊ दिला जाणार नाही.
निवृत्त जनरल नसीर खान जानजुआ यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक झाल्यानंतर बरेच बदल घडले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांतील चर्चा पुन्हा सुरू होणार आहे. त्यात दहशतवादाच्या मुद्दय़ाचाही समावेश असेल, असे एका वरिष्ठ राजनतिक अधिकाऱ्याने सांगितले.
मोदी आणि शरीफ यांच्यातील चर्चा लष्कराच्या आशीर्वादाने झाली आहे. लष्कर प्रमुख राहील शरीफ हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेले निवृत्त जनरल नसीर खान जानजुआ यांच्या जवळचे मानले जातात. सुरक्षा सल्लागार पदावरून सरताज अझीज यांच्या जागी जानजुआ यांची ऑक्टोबरमध्ये निवड करण्यात आली होती. भारताशी चर्चा करणे सोपे होण्यासाठी यासाठी जानजुआ यांची नेमणूक केली होती आणि त्या दिशेने पावले पडल्याचे स्पष्ट झाले आहे. जानजुआ याचा या क्षेत्रातील अनुभव मोठा असून दोन्ही देशांतील शांतता प्रक्रिया पुढे नेण्यात ते यशस्वी होतील यात शंका नाही, असे शरीफ मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने डिसेंबरच्या सुरुवातीलाच सांगितले होते. दोन्ही देशांतील चच्रेस पाकिस्तानचा पािठबा मिळणे हे महत्त्वाचे आहे. जानजुआ यांनी त्यात जनरल शरीफ यांचा पािठबा मिळवण्यात मोठी भूमिका पार पाडली आहे. पॅरिस येथे दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची भेट झाली होती व त्यानंतर परिस्थिती बदलली हे खरे असले तरी पाकिस्तानी लष्करच तेथे अजूनही सर्वेसर्वा असल्याने त्यांचा आशीर्वाद मिळवण्यात जानजुआ यांनी भूमिका पार पाडली. त्यानंतरच शरीफ व मोदी यांच्यात चर्चा होऊ शकली, असे एका भारतीय वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितेल.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला ‘हार्ट ऑफ आशिया परिषदे’च्या निमित्ताने दिलेली भेटही पाकिस्तानने खुलेपणाची भूमिका घेतल्याचाच भाग होता. स्वराज यांनीही पाकिस्तानला सोसवेल त्या वेगाने चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती.

अमेरिकेचा दबाव
पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ हे गेल्या महिन्यांत अमेरिकेला गेले होते. त्यावेळी त्यांना भारताशी संबंध चांगले राहतील, याची दक्षता घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, मायदेशी गेल्यानंतर वाटाघाटी सुरू करा असेही त्यांना अमेरिकेने सांगितले होते. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी आणि इतरांनी राहील शरीफ यांच्याशी चच्रेत भारताशी संबंधांचा मुद्दा वेळोवेळी काढून भारत-पाकिस्तान यांच्यात शांतता नांदणे आताच्या काळात फार महत्त्वाचे असल्याचे सांगितले होते.