04 March 2021

News Flash

पाकिस्तानकडून भारतीय चौक्या उद्ध्वस्त करतानाचा व्हिडीओ प्रसिद्ध

२७ सेकंदाचा व्हिडीओ प्रसिद्ध

पाकिस्तान सैन्याने रविवारी सीमा रेषेवर भारतीय चौक्या उद्ध्वस्त करतानाचा व्हिडीओ जारी केला आहे.

पाकिस्तानी सैन्याने रविवारी सीमा रेषेवर भारतीय चौक्या उद्ध्वस्त करतानाचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. निवासी भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या भारतीय चौक्या उद्ध्वस्त केल्याचे पाकिस्तानी सैन्याने म्हटले आहे.

पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी ट्विटरवर २७ सेकंदाचा व्हिडीओ अपलोड केला आहे. ३ जून रोजी पाकिस्तानी सैन्याने निवासी भागांमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या भारतीय चौक्या उद्ध्वस्त केल्याचे गफूर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पाकिस्तानने शनिवारी पाच भारतीय जवानांना ठार मारल्याचा दावा केला होता. तर भारताने पाकचा हा दावा फेटाळून लावला होता. भारताच्या दाव्यानंतर गफूर यांनी २७ सेकंदाचा व्हिडीओ प्रसिद्ध जारी करुन भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

गेल्या दोन आठवड्यात पाकिस्तानने दुसऱ्यांदा अशा स्वरुपाचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. यापूर्वी २४ मेरोजी रोजी पाक सैन्याने सीमा रेषेवर भारतीय चौकी उद्ध्वस्त करतानाचा व्हिडीओ जारी केला होता.शनिवारी पाकिस्तानी सैन्याच्या प्रवक्त्यांनी भारताच्या पाच जवानांना मारल्याचा दावा केला होता. पण ही घटना नेमकी कुठे झाली आणि अन्य सविस्तर माहिती देण्यास पाकने नकार दिला होता. भारतीय सैन्याने पाकच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली होती. पाक सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने सीमा रेषेजवळील गावात राहणारी महिला जखमी झाली होती. यानंतर भारतीय सैन्याने पाकला प्रत्युत्तरात गोळीबार केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2017 4:11 pm

Web Title: pakistan army released video showing destruction caused to the indian military posts
Next Stories
1 अमेरिकेच्या व्हिसासाठी द्यावी लागणार सोशल मीडियावरील अकाऊंट्सची माहिती
2 चीनच्या हेलिकॉप्टरची घुसखोरी, भारताच्या हवाई हद्दीत केला प्रवेश
3 मोदी सरकार काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्यात अपयशी: राहुल गांधी
Just Now!
X