News Flash

पाकिस्तान त्यांच्या लष्कराचा वापर जनतेविरोधात करत नाही-अरुंधती रॉय

लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांचं वादग्रस्त वक्तव्य

”पाकिस्तानमध्ये लष्कराचा वापर त्यांच्या जनतेविरोधात केला जात नाही. भारतात मात्र काही राज्यामध्ये नागरिकांविरोधात लष्कर उभं केलं जातं” असा दावा लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांनी एका कार्यक्रमात केला. त्यांनी केलेल्या या दाव्यावरुन त्यांना सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात ट्रोल केलं जातं आहे. त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला जातो आहे. नेटकरी त्यांना खडे बोल सुनवत आहेत.

ज्येष्ठ लेखक तारेक फतेह यांनीही अरुंधती रॉय यांच्या या दाव्याला ट्विट करुन उत्तर दिलं आहे. ”अरुंधती रॉय म्हणतात की पाकिस्तान त्यांच्या लष्कराचा वापर जनतेविरोधात करत नाही. त्या आंधळ्या आणि बहिऱ्या आहेत का? १९७१ मध्ये काय घडलं त्यांना माहित नाही का? त्यांना बलोचिस्तानची स्थिती ठाऊक नाही का? त्या पाकिस्तानच्या आयएसआयने लिहून दिलेले पत्रक वाचत असल्याचं वाटतंय.” अशी टीका तारेक फतेह यांनी केली आहे.

”१९४७ पासून म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशातल्या काही राज्यांमध्ये नेहमीच नागरिकांविरोधात सैन्य तैनात करण्यात आलं आहे. काश्मीर, मिझोराम, नागालँड, पंजाब, गोवा या राज्यांमधल्या नागरिकांनी बंड केलं तेव्हा सरकारने लष्कराचा दबाव या राज्यांवर आणला. मात्र पाकिस्तानसारख्या देशात असं कधीही घडलं नाही. हिंदू देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकशाही देशात मात्र हे घडले आहे.” असे वादग्रस्त वक्तव्य अरुंधती रॉय यांनी केले. त्यांनी हे वक्तव्य केल्यापासून त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला जातो आहे.

काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० हटवलं गेल्यापासून अनेकजण त्यावर टीका करताना दिसत आहेत. अनुच्छेद ३७० रद्द करण्याआधी जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्याच अनुषंगाने अरुंधती रॉय यांनी ही टीका केली आहे. यासाठी त्यांनी भारतातल्या इतर राज्यांचाही संदर्भ दिला आहे. काश्मीर भारतापासून वेगळा झाला पाहिजे या विचारसरणीच्या अरुंधती रॉय आहेत, असं ‘गल्फ न्यूज’ने म्हटलं आहे २०१३ मध्ये जेव्हा भाजपाने पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून नरेंद्र मोदी यांचं नाव पुढे केलं तेव्हा ही एक ‘ट्रॅजिडी’ आहे अशी टीकाही अरुंधती रॉय यांनी त्यावेळी केली होती. आता पुन्हा एकदा त्यांचं वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 6:56 pm

Web Title: pakistan army was never used against its own people says arundhati roy scj 81
Next Stories
1 प्रेमात नकार पचवता आला नाही, तरुणाने तरुणीची जाळली स्कूटर
2 छत्तीसगड : सुकमात पाच नक्षलवाद्यांना अटक, शस्त्रसाठा जप्त
3 “राहुल गांधींनी पक्षातल्या वरिष्ठांची चर्चा करावी मग केंद्रावर आरोप करावेत”
Just Now!
X