News Flash

काश्मीरला भारताचा भाग दाखवणाऱ्या पुस्तकावर पाकिस्तानने घातली बंदी

पंजाब प्रांतातील खासगी शाळांमधील सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात नकाशामध्ये काश्मीर भारताचा भाग असल्याचं दाखवण्यात आलं होतं

काश्मीरला भारताचा भाग दाखवणाऱ्या पुस्तकावर पाकिस्तानने बंदी घातली आहे. पंजाब प्रांतातील खासगी शाळांमधील सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात नकाशामध्ये काश्मीर भारताचा भाग असल्याचं दाखवण्यात आलं होतं. ‘दुसरी, चौथी, पाचवी, सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात काही वादग्रस्त गोष्टी होत्या. खासकरुन त्यामध्ये पाकिस्तानच्या नकाशात काश्मीर भारताचा भाग असल्याचं दाखवण्यात आलं होतं’, अशी माहिती पंजाब अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक मंडळाने दिली आहे.

पंजाब अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक मंडळ सरकारचा भाग असून त्यांनी लाहोर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार करत खासगी शाळा आणि प्रकाशकांविरोधात इतकी गंभीर चूक केल्याप्रकरणी फौजदारी खटला दाखल करण्याची मागी केली आहे. अशा चुका भविष्यात होऊ नये यासाठी बोर्डाने, आमच्या परवानगीविना कोणत्याही पुस्तकाची छपाई, विक्री केली जाऊ नये असा आदेश दिला आहे.

सर्व जिल्हा कार्यकारी अधिकाऱ्यांना खासगी शाळांच्या गोदामातून संबंधित पुस्तकं जप्त करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पंजाब अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अब्दुल कय्यूम यांनी गुरुवारी नोटिफिकेशन जारी करत खासगी शाळांमध्ये या पुस्तकावर तात्काळ बंदी आणण्याचा आदेश दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 2:40 am

Web Title: pakistan bans book showing kashmir as part of india
Next Stories
1 मनुष्याची हत्या करेल असं कोणतंही तंत्र विकसित करणार नाही – गुगल
2 राष्ट्रवादीचे रविवारी पुण्यात शक्तिप्रदर्शन
3 धक्कादायक ! १२ वर्षाच्या मुलाचा अडीच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्काराचा प्रयत्न
Just Now!
X