News Flash

पाकिस्तानातील शक्तिशाली बॉम्बस्फोटात १५ ठार

बॉम्बस्फोट झाला त्यावेळी बसमध्ये ५० जण होते.

पाकिस्तानातील पेशावर येथील ख्रिश्चन कॉलनीत सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त रॉयटरने दिले आहे.

पाकिस्तानमधील पेशावर येथे बुधवारी एका बसमध्ये झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात १५ जण ठार आणि ३० जण जखमी झाले आहेत. या बसमध्ये मोठ्याप्रमाणावर सरकारी कर्मचारी होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. बॉम्बस्फोट झाला त्यावेळी बसमध्ये ५० जण होते. बस पेशावरच्या सद्दर भागातील मुख्य रस्त्यावरून शहराकडे जात असताना हा स्फोट झाला. या बॉम्बस्फोटाबद्दल आत्ताच काही बोलणे उचित ठरणार नाही. मात्र, प्रथमदर्शनी पाहता स्फोटके बसच्या आतल्या भागात ठेवली असावीत, असा आमचा अंदाज असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहम्मद काशिफ यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2016 10:47 am

Web Title: pakistan bus blast in peshawar kills at least 15 government employees
Next Stories
1 पाकिस्तानच्या अनपेक्षित मदतीमुळे भारताला तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश
2 सुरक्षा स्थिती उपयोजनाच्या वापरात फेसबुकवर पक्षपातीपणाचा आरोप
3 उमर, अनिर्बनच्या सुटकेसाठी मोर्चा
Just Now!
X