News Flash

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन; पूंछ सेक्टरमध्ये अंदाधुंद गोळीबार

उखळी तोफांचाही मारा

पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला.

पाकिस्तानी सैन्याकडून आज, शनिवारी पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. जम्मू-काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने अंदाधुंद गोळीबार केला. एएनआयने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.

पाकिस्तानच्या बाजूने भारतीय हद्दीत पुन्हा गोळीबार करण्यात आला. जम्मू-काश्मीरमध्ये पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने अंदाधुंद गोळीबार केला. उखळी तोफांचा माराही केला. दरम्यान, शुक्रवारी कुपवाडामधील केरान सेक्टरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. तर त्याच्या काही तासांनीच पुलवामामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. तर त्याच दिवशी पाकिस्तानी सैन्याकडून पूंछ सेक्टरमधील खारी करमरा भागात शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं होतं. पाकिस्तानी सैन्यानं भारतीय हद्दीत गोळीबार केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2017 5:39 pm

Web Title: pakistan ceasefire violation in jammu and kashmir poonch sector
Next Stories
1 पाकिस्तानची झाडाझडती होणार!
2 प्रेमविवाह केला म्हणून मुलीला जिवंत जाळलं; नणंदही भाजली
3 पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या क्रौर्याचा कळस,भारतीय जवानांच्या मृतदेहांच्या विटंबनेचे चित्रीकरण
Just Now!
X