पाकिस्तान हा अमेरिकेचा महत्वाचा सहकारी देश असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ अमेरिका दौऱयावर आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून शरीफ प्रथमच अमेरिका दौऱयावर गेले आहेत. त्यांनी केरी यांची भेट घेतली.
नवाझ शरीफ आज (सोमवार) अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत.
अमेरिकेची १.६ अब्ज डॉलरची पाकिस्तानला मदत
केरी म्हणाले, पाकिस्तानबरोबर चांगले संबंध ठेवणे याशिवाय आमच्यासाठी दुसरे काही महत्वाचे असू शकत नाही. बराक ओबामांनी पाकिस्तानच्या आर्थिक स्थैर्यासाठी मदतही जाहीर केली आहे. पाकिस्तान बरोबर याआधीही आम्ही चर्चा करत आलो आहोत. पाकिस्तानात राबविण्यात येणाऱया लोकशाहीमुळे तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे. असेही केरी म्हणाले.