News Flash

२६/११ हल्ला : पाकिस्तानातील खटल्याची सुनावणी सलग आठव्यांदा तहकूब

मुंबईतील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भातील खटल्यात पाकिस्तानकडून सहकार्याची अपेक्षा धूसर होत चालली आहे. दहशतवादविरोधी न्यायालयात या खटल्याची सुनावणी बुधवारी सलग आठव्यांदा तहकूब करण्यात आली.   सरकारी साक्षीदार

| September 4, 2014 03:38 am

मुंबईतील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भातील खटल्यात पाकिस्तानकडून सहकार्याची अपेक्षा धूसर होत चालली आहे. दहशतवादविरोधी न्यायालयात या खटल्याची सुनावणी बुधवारी सलग आठव्यांदा तहकूब करण्यात आली.
   सरकारी साक्षीदार आणि वकील न्यायालयात पुन्हा हजर न राहिल्याने ही सुनावणी तहकूब करण्यात आल्याचे सांगण्यात आले. रावळपिंडी येथील दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्यायाधीश अत्तिकर रेहमान हे सुमारे दीड महिन्याची उन्हाळी सुटी संपवून परतल्यानंतर बुधवारी सुनावणीस आरंभ झाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या खटल्यातील ‘महत्त्वाचा सरकारी साक्षीदार’ बुधवारी न्यायालयात राहायचा होता. परंतु तो न आल्याने न्यायालयाने त्याला येत्या १० सप्टेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश दिले.
गेल्या मेपासून सरकारी वकील न्यायालयात हजर राहत नसल्याने या खटल्याची सुनावणी नियमित होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. खरे सांगायचे तर गेल्या तीन महिन्यांपासून मुंबई हल्ला खटल्याची सुनावणी झालेली नाही, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.
सरकारी वकिलाच्या अनुपस्थितीतच या खटल्याची सुनावणी सुरू आहे. २८ मे, ४ जून आणि त्यानंतर २ जुलै या तीनही वेळा सरकारी वकील न्यायालयात दिसले नाहीत. यासाठी सुरक्षेचे कारण पुढे केले जात आहे, असे स्पष्ट करण्यात आले. जमात उद दवाह या संघटनेच्या वतीने धमक्या दिल्या जात आहेत. या गोष्टी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.
‘लष्कर ए तइबा’च्या झाकीर रेहमान लखवी, अब्दुल वाजिद, मझहर इक्बाल, हमाद अमीन सादिक, शाहिद जमील रियाज, जमील अहमद आणि अंजुम या सात जणांवर २६/११ च्या हल्ल्याचे नियोजन; तसेच वित्तपुरवठा आणि तो घडवून आणण्यात सक्रिय सहभाग घेतल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 3:38 am

Web Title: pakistan court adjourns 2611 mumbai attacks
Next Stories
1 शिक्षकांनी जागतिक बदलांना आत्मसात केले पाहिजे – नरेंद्र मोदी
2 भारतात संघटना वाढविण्याचा अल-कायदाचा फुत्कार; केंद्राकडून सतर्कतेचे आदेश
3 ‘पश्चिम घाट वाद लोकशाही मार्गाने सोडवू’
Just Now!
X