News Flash

पाकिस्तानात भूकंपबळींची संख्या ५१५

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात झालेल्या भूकंपातील बळींची संख्या ५१५ झाली आहे. कोसळलेल्या इमारतींचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून, बळींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता देशाच्या आपत्कालीन विभागाने

| September 28, 2013 12:44 pm

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात झालेल्या भूकंपातील बळींची संख्या ५१५ झाली आहे. कोसळलेल्या इमारतींचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून, बळींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता देशाच्या आपत्कालीन विभागाने व्यक्त केली.
भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या अवरान भागात सर्वाधिक नुकसान झाले असून, पाकिस्तानी सैन्यदलाचे तिथे बचावकार्य सुरू आहे. मात्र दहशतवादी वारंवार या बचावकार्यात अडथळे आणत आहेत. सैन्यदलाची हेलिकॉप्टर या परिसरात अन्नपदार्थ पुरवत असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात हेलिकॉप्टरचे काहीही नुकसान झाले नाही. गुरुवारीही सैन्यदलाच्या हेलिकॉप्टरवर दहशतवाद्यांनी रॉकेटहल्ला केला. त्यात राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रमुखांसह सैन्यदलाचा एक अधिकारी वाचला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2013 12:44 pm

Web Title: pakistan death toll in the earthquake rises to 515
टॅग : Earthquake
Next Stories
1 जम्मू हल्ला : अब्दुल्लांकडून सुरक्षा यंत्रणांची कानउघडणी
2 केनिया मॉलवरील हल्ला : दहशतवाद्यांनी वापरलेली गाडी सापडली?
3 अखिलेश यादव सरकार मुझफ्फरनगर दंगलग्रस्तांना शासकीय नोकऱया देणार!
Just Now!
X