23 February 2018

News Flash

पाकला अखेर उपरती, हाफिज सईद दहशतवादी घोषित

अध्यादेशावर राष्ट्रपती ममनून हुसेन यांनी स्वाक्षरी केली

कराची | Updated: February 13, 2018 10:24 AM

आतापर्यंत पाकिस्तानने जमात उद दावासारख्या संघटनांचा फक्त दहशतवादी संघटनांच्या सूचीत समावेश केला होता.

मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला पाकिस्तानने मोठा झटका दिला आहे. सईद व त्याची दहशतवादी संघटना जमात उद दावाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेद्वारे (यूएनएससी) प्रतिबंधित व्यक्ती आणि लष्कर ए तोयबा, अल कायदा तसेच तालिबानसारख्या संघटनांना लगाम घालण्याचा उद्देश असलेल्या एका अध्यादेशावर राष्ट्रपती ममनून हुसेन यांनी स्वाक्षरी केली आहे. या सूचीत हाफिज सईदची दहशतवादी संघटना जमात उद दावाचाही समावेश आहे.

आतापर्यंत पाकिस्तानने जमात उद दावासारख्या संघटनांचा फक्त दहशतवादी संघटनांच्या सूचीत समावेश केला होता. पाकिस्तानकडून कधी बंदीची चर्चा केली जात तर कधी या संघटनेला देणगी घेण्यावर बंदी लादण्याची चर्चा केली जात. पण आता राष्ट्रपतींद्वारे अध्यादेशावरील स्वाक्षरीनंतर जमात उद दावा अधिकृतरित्या दहशतवादी संघटना ठरली आहे. यामागे पॅरिस येथे फायनान्शियल टास्क फोर्सची बैठक होणार आहे. यामध्ये मनी लाँडरिंगसारख्या विविध प्रकरणांवरून विविध देशांवर निगराणी ठेवली जाते. त्यापूर्वीच पाकिस्तान स्वत:ला स्वच्छ दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. पण पाकिस्तानचे हे पाऊल निव्वळ धुळफेक असल्याचेही बोलले जात आहे. कारण अध्यादेश हा ठराविक काळानंतर संपुष्टात येऊ शकतो. कारण त्याचा निश्चित असा कालावधी ठरलेला असतो. त्यामुळे जर पाकिस्तानने वेळेत कायदा केला नाही तर ही सरळसरळ धुळफेकच असेल, असे म्हटले जाते.

याबाबत विस्तृत माहिती देण्यास राष्ट्रपती भवनातील अधिकाऱ्याने नकार दिला आहे. पण त्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यूएनएससीच्या प्रतिबंधित सूचीत अल कायदा, तहरिक ए तालिबान पाकिस्तान, लष्कर ए झांगवी, जमात उद दावा, फलाह ए इन्सानियत फाउंडेशन, लष्कर ए तोयबा आणि इतर संघटनांचा समावेश आहे.

First Published on February 13, 2018 10:24 am

Web Title: pakistan declares hafiz saeed a terrorist jamaat ud dawa
  1. Vijay Shankar Mahajan
    Feb 13, 2018 at 2:56 pm
    चीनच काय ? त्यांना पण हे महाशय फार आदरणीय आहेत.
    Reply