22 September 2020

News Flash

शस्त्रसंधीच्या उल्लंघनप्रकरणी भारताने पाकच्या उपउच्चायुक्तांना बजावले समन्स

शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत भारतावर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या कारवाईचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत भारतावर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या कारवाईचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. तसेच पाकच्या या कृतीसाठी भारतातील पाकिस्तानचे उप उपच्चायुक्तांना समन्स बजावण्यात आले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानचे उपउच्चायुक्त सैय्यद हैजर शाह यांना समन्स बजावले आहे. त्यानुसार, शाह यांनी संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास साऊथ ब्लॉकमध्ये हजेरी लावली.

भारताने मंगळवारी पाकिस्तानात घुसून तिथले दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते. त्यानंतर चिडलेल्या पाकिस्तानने आज (बुधवारी) भारताच्या सैन्य तळांवर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. भारतीय हवाई दलाने त्यांचा हा प्रयत्न हाणून पा़डला. उलट भारताने उत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले.

दरम्यान, पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय हवाई दलाचे मिग २१ विमान कोसळले असून या विमानातील वैमानिक बेपत्ता असल्याचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले. पाकिस्ताननं हा वैमानिक आपल्या ताब्यात असल्याचं म्हटलं असून या संदर्भात चौकशी करण्यात येत असल्याचंही रवीश कुमार यांनी सांगितलं.

आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही पाकिस्तानला त्यांच्या जमीनीवरुन होत असलेल्या दहशतवादी गटांवर कारवाई करण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. मात्र, त्यामुळे चिडलेल्या पाकिस्तानने भारताविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. या सर्व गोष्टींचा जाब विचारण्यासाठीच पाकिस्तानी उपउच्चायुक्तांना समन्स बजावण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2019 6:11 pm

Web Title: pakistan deputy high commissioner syed haider shah summoned by ministry of external affairs
Next Stories
1 IAF च्या वैमानिकासाठी ओवेसींची प्रार्थना, पाकला करुन दिली जीनेव्हा कराराची आठवण
2 इम्रान खान चर्चेस तयार; मसूद अझहर, आयएसआयचे काय ?
3 हेलिकॉप्टर अपघातात नेपाळच्या पर्यटन मंत्र्यांचा मृत्यू
Just Now!
X