27 September 2020

News Flash

… म्हणून पाकिस्ताननं थेट सौदी अरेबियालाच दिला इशारा

सौदी अरेबियावर आयओसीची बैठक बोलावण्यासाठी पाकिस्तानचा दबाव

चीन आणि तुर्कस्थानच्या सांगण्यावरून चालणाऱ्या पाकिस्तानने आता काश्मीरच्या मुद्द्यावरून आपला जुना मित्र सौदी अरेबियालाच इशारा दिला. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीजला (ओआयसी) थेट इशाराच देऊन टाकला. ओआयसीमध्ये काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानचे पाय खेचणं थांबवावं, असं म्हणत त्यांनी इशाराच दिला.

“आम्ही ओआयसीचा मान ठेवतो. ओआयसीच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीद्वारे आम्हाला अपेक्षा आहेत. जर ही बैठक आपण बोलावू शकत नसाल तर काश्मीर मुद्द्यावर आमच्यासोबत असलेल्या इस्लामिक राष्ट्रांची बैठक बोलावण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सांगण्यास मी बांधिल आहे,” असं कुरेशी म्हणाले. पाकिस्तानमधील वृत्तवाहिनी एआरव्हायला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

“पाकिस्तान अजून अधिक काळ वाट पाहू शकत नाही,” असंही ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. जर आयओसीमधील देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली तर काश्मीरच्या मुद्द्यावर भारताला एक स्पष्ट संदेश जाणार असल्याचाही ते म्हणाले. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यापासूनच पाकिस्तान सौदी अरेबियावर आयओसीची बैठक बोलावण्यासाठी दबाव आणत आहे. परंतु आतापर्यंत त्यांना यात यश मिळालेलं नाही.

आयओसीची कोणतीही बैठक न होण्यामागे सौदी अरेबियाचाच हात असल्याचं पाकिस्तानातील डॉन या वृत्तपत्रातील एका अहवालात सांगण्यात आलं होतं. सौदी अरेबिया आयओसीच्या माध्यमातून भारताच्याविरोधात पाकिस्तानला साथ देत नसल्याचंही त्यात म्हटलं होतं. आयओसीमध्ये सौदी अरेबियाची साथ मिळणं सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. तसंच यात सौदी अरेबिया आणि त्यांच्या सहकारी देशांचाच दबदबा आहे.

आखाती देशांनी समजावं

“आमच्याही काही भावना आहेत. त्या समजून आखाती देशांनी समजून घेतल्या पाहिजेत. भावनिक होऊन आपण हे विधान करत नाही. सौदी अरेबियासोबत आमचे संबंध उत्तम आहेत. तरीही आमची भूमिका स्पष्ट करतो,” असंही कुरेशी म्हणाले. काश्मीरच्या मुद्द्यावर कोणतंही पाऊन न उलल्यानं पाकिस्तानची निराशा वाझ आहे. यापूर्वी इम्रान खान यांनीदेखील यावर निराशा व्यक्त केल्याचं डॉननं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 2:38 pm

Web Title: pakistan foreign minister shah mahmood quareshi threatens oic saudi arab india kashmir issue jud 87
Next Stories
1 मशीद बांधण्यासाठी राम मंदिर पाडलं जाईल!; मुस्लिम नेत्याची दर्पोक्ती
2 काश्मीरमध्ये भाजपा नेत्याची दहशतवद्यांकडून गोळ्या घालून हत्या, ४८ तासातील दुसरा हल्ला
3 UNSC मध्ये काश्मीर मुद्दावरुन चीन-पाकिस्तान दोघेही पडले तोंडावर
Just Now!
X