News Flash

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना करोना व्हायरसची लागण

माझ्यामध्ये ऊर्जा कायम आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: शुक्रवारी टि्वट करुन करोना व्हायरसची बाधा झाल्याची माहिती दिली. कुरेशी नियमानुसार क्वारंटाइन झाले आहेत. करोनाची लागण झालेले ते पाकिस्तानातील वरिष्ठ राजकारणी आहेत.

“आज दुपारी मला सौम्य ताप आला होता. करोना चाचणी केल्यानंतर माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. करोनाची लागण झाली असली तरी, मला सशक्त वाटत असून माझ्यामध्ये ऊर्जा कायम आहे. मी घरातूनच सर्व काम करणार आहे. कृपाकरुन माझ्यासाठी प्रार्थना करा” असे कुरेशी यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 11:22 am

Web Title: pakistan foreign minister shah mehmood qureshi tests covid 19 positive dmp 82
Next Stories
1 हैदराबादी बिर्याणीने मिळवून दिला हक्काचा रोजगार, परप्रांतीय मजुरांसाठी धावून आलं बिहार प्रशासन
2 करोनासंदर्भात WHO चा­ चीनवर मोठा आरोप
3 अरे बापरे… देशात करोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ
Just Now!
X