News Flash

“भारतावर बहिष्कार घाला”; जावेद मियाँदाद बरळला…

"माणसांची पशूंप्रमाणे कत्तल करणाऱ्या भारताविरोधात सगळ्यांनी एकत्र या. कारण भारत आता संपलाय"

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय वातावरण कायम तापलेले असते. आधी पुलवामा दहशतवादी हल्ला आणि एअर-स्ट्राईक तर त्यानंतर ३७० कलम या मुद्द्यांवरून पाकिस्तान आणि भारता यांच्यात राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळाले. आता सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे (CAA) भारत आणि पाकिस्तानातील काही प्रसिद्ध व्यक्ती एकमेकांवर आगपाखड करताना दिसत आहेत. या दरम्यान पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियांदाद यांनी एक विचित्र आणि अजब मागणी केली आहे.

“हिंदू-मुस्लीम वाद पाकिस्तानातच, आम्ही तर अझरूद्दीनला कर्णधार केलं होतं”

“माझे ICC ला असे आवाहन आहे की क्रिकेट खेळणाऱ्या सर्व देशांचे भारत दौरे रद्द करण्यात यावेत. आता आपण बघू या की ICC हे प्रकरण कसे हाताळते. या प्रकरणी ICC योग्य न्याय करते का आणि त्यांच्या कारवाईतून जगात काय संदेश जातो, ते आपण पाहू या. माझी ICC ला अशी विनंती आहे की भारतालाही इतर देशांमध्ये क्रिकेट खेळायला जाण्यापासून रोखायला हवे. भारतात वर्णभेद सुरू आहे. काश्मीरी जनता आणि मुस्लीम यांच्याबाबत द्वेष पसरवला जात आहे. आपण क्रीडापटूंनीदेखील हा मुद्दा उचलून धरला पाहिजे”, असे जावेद मियांदाद एका पाकिस्तानी क्रीडा वेबसाईटशी बोलताना म्हणाले.

…तर हा गुन्हा नाही – रोहित शर्मा

“मी सगळ्या देशांना कळकळीची विनंती करतो की साऱ्यांनी माणुसकीच्या बाजूने उभे राहूया आणि भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध करूया. सारं जग हे पाहत आहे आणि सगळे लोक याबाबत चिंता व्यक्त करत आहेत. संयुक्त राष्ट्र संघटनेतही याबाबत चर्चा होत आहे. माणसांची पशूंप्रमाणे कत्तल करणाऱ्या भारताविरोधात सगळ्यांनी एकत्र येऊया. भारताला या प्रकाराची लाज वाटली पाहिजे. भारत आता संपलेला आहे”, अशी दर्पोक्ती मियांदादने केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 5:49 pm

Web Title: pakistan former cricketer javed miandad slam attack india over caa protests says india should be ashamed india is finished vjb 91
Next Stories
1 “हिंदू-मुस्लीम वाद पाकिस्तानातच, आम्ही तर अझरूद्दीनला कर्णधार केलं होतं”
2 …तर हा गुन्हा नाही – रोहित शर्मा
3 SA vs ENG : क्रिकेट सामन्याला उशीर, कारण ठरला फोटोग्राफर…
Just Now!
X