तालिबान्यांनी पाकिस्तानच्या २३ सैनिकांचा शिरच्छेद केल्याने त्यांच्यासमवेत शांतता चर्चा सुरू ठेवण्यास पाकिस्तान सरकारने असमर्थता दर्शविली आहे. सर्व प्रकारची हिंसक कृत्ये तालिबान्यांनी त्वरित थांबवावीत, असे पाकिस्तान सरकारने म्हटले आहे.तालिबान्यांनी २०१०पासून ओलीस ठेवलेल्या सैनिकांची हत्या केल्यानंतर शांतता प्रक्रियेला खीळ बसली आहे. शांतता चर्चेतून चांगले निष्पन्न व्हावे यासाठी तालिबान्यांनी हिंसाचार त्वरित थांबविला पाहिजे. ठोस पावले उचलल्याशिवाय चर्चेत प्रगती होणार नाही. त्यामुळे तालिबान्यांनी बिनशर्त हिंसाचार थांबवावा, असे पंतप्रधानांच्या कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.