News Flash

पाकिस्तानचे आरोग्यमंत्री करोनाबाधित

परराष्ट्रमंत्र्यानंतर आरोग्य मंत्र्यांनाही करोनाचा संसर्ग

पाकिस्तानमध्ये करोना विषाणूमुळे परिस्थिती गंभीर आणि चिंताजनक होत आहे. वेगाने पसरणाऱ्या करोनाचा संसर्ग सर्वसामान्य जनतेसह केंद्रीय मंत्र्यांनाही होत आहे. पाकिस्तानचे आरोग्यमंत्री डॉ जफर मिर्जाही करोना संक्रमित झाले आहेत. आरोग्यमंत्री मिर्जा यांच्या करोनाचा चाचणीचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर जफर मिर्जा यांनी स्वत:ला घरातच क्वारइंटाइन केलं आहे. याआधी शुक्रवारी परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आलं होतं. दोन्ही नेत्यांच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

सोमवारी मिर्जा यांनी ट्विटरद्वारे करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, ‘गेल्या काही दिवसांपासून मला करोनाची लक्षणे जाणवली होती. त्यावेळी योग्य ती काळजीही घेतली. करोनाची चाचणी केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मी स्वत: ला होम क्वारंटाइन करत आहे.’ यावेळी मिर्जा यांनी करोना लढ्यातील आपल्या सहकाऱ्यांचं कौतुक केलं.

डॉ. मिर्जा पाकिस्तानमधील करोनाविरुधच्या लढाईचे नेतृत्व करत होते. त्यांना अनेक टीकेंचा सामनाही करावा लागला होता. डॉ. मिर्जा आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर करोनाबाधित रुग्णांची संख्या लपवल्याचा आरोप आहे. परराष्ट्रमंत्री कुरैशी आणि आरोग्यमंत्री मिर्जा यांच्याशिवाय पाकिस्तानमधील इतर नेत्यांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. यामधील काही नेत्यांचा मृत्यूही झाला आहे. असद कैसर, शहबाज शरीफ, इमरान इस्माइल, सईद गनी आणि शेख राशिद यांनी करोनावर मात केली आहे. तर सैयद फजल आगा, शाहीन रजा, गुलाम मुर्तजा, मुनीर खान, मियां जमशेद दीन काकखेल यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

पाकिस्तानमध्ये दिवसागणिक करोना विषाणूचा संसर्ग वाढतच आहे. सोमवारी देशात तीन हजार ३४४ नवे रुग्ण आढळले. पाकिस्तानमधील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या दोन लाख ३१ हजार इतकी झाली आहे. आतापर्यंत चार हजार ७६२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 11:24 am

Web Title: pakistan health minister dr zafar mirza covid 19 positive quarantined himself home nck 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 नैराश्यामुळे टिकटॉक स्टारची आत्महत्या
2 अमेरिकेतल्या कर्मचाऱ्यांना Infosys ने स्पेशल चार्टर्ड विमानाने आणलं परत, 200 हून अधिक जण भारतात परतले
3 भारतानंतर अमेरिकाही टिकटॉकसह चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या तयारीत
Just Now!
X