News Flash

पाकिस्तान भित्रा आणि कमकुवत, लष्कराच्या जवानांना माझा सलाम-राहुल गांधी

पाकिस्तानचे घृणास्पद मनसुबे उधळणाऱ्या लष्कराला सलाम असंही राहुल गांधींनी म्हटलंय

संग्रहीत छायाचित्र

पाकिस्तान जेव्हा जेव्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करतो तेव्हा तेव्हा पाकिस्तानचा भीती आणि कमकुवतपणा समोर येतो.. अधिकाधिक स्पष्ट होतो असं काँग्रेस राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. देशात करोनाचं संकट असतानाही अवघा देश दिवाळीचा आनंद साजरा करतो आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातं आहे ही बाब निषेधार्ह आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. आपल्या देशाचे सैनिक देशाची सुरक्षा करण्यासाठी सज्ज आहेत. पाकिस्तानचे घृणास्पद मनसुबे उधळून लावत आहेत. लष्कराच्या सगळ्या जवानांना माझा सलाम असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानचे सात ते आठ सैनिक लष्कराच्या कारवाईत मारले गेले आहेत.याशिवाय भारतीय लष्कराने पाकिस्तानी लष्कराचे बंकर्स, लाँच पॅड्स उद्ध्वस्त करत मोठं नुकसान केलं आहे.

पाकिस्तानकडून केरन, उरी, नौगाम सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. यावेळी नागरी वस्ती असलेल्या ठिकाणांना पाकिस्तानकडून टार्गेट करण्यात आल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे. यामध्ये भारताचे तीन जवान शहीद झाले असून तीन जण जखमी झाले आहेत.

दरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एक ट्विट करुन पाकिस्तानवर कडाडून टीका केली आहे. पाकिस्तान भित्रा, पळपुटा आहे. शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर हे वारंवार स्पष्ट होतं असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच भारताचं रक्षण करणाऱ्या आणि पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या आपल्या देशाच्या जवानांना त्यांनी सलामही केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2020 8:24 pm

Web Title: pakistan is coward and weak i salute indian army says rahul gandhi scj 81
टॅग : Rahul Gandhi
Next Stories
1 नितीशकुमार दगाफटका करण्यात माहीर, बिहारमध्ये राजकीय भूकंप शक्य-संजय राऊत
2 मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे सोपवला राजीनामा
3 पाकिस्तानला भारतीय लष्कराचं चोख प्रत्युत्तर, आठ सैनिकांना केलं ठार; बंकर्स आणि लाँच पॅड्स उद्ध्वस्त
Just Now!
X