12 December 2017

News Flash

पाकिस्तान दहशतवाद्यांचे आश्रयस्थान -ओबामा

पाकिस्तान हे दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असल्याबद्दल चिंता व्यक्त करून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी या

पीटीआय, वॉशिंग्टन | Updated: January 13, 2013 4:12 AM

पाकिस्तान हे दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असल्याबद्दल चिंता व्यक्त करून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केवळ लष्करी कारवाईपेक्षा अधिक कडक उपाययोजनांची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.
अफगाणिस्तान, अमेरिका आणि पाकिस्तान या तिघांनाही अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या सीमेवरील दहशतवाद कमी होण्यात स्वारस्य आहे, असे ओबामा यांनी अमेरिकेच्या दौऱ्यावर आलेले अफगाणिस्तानचे अध्यक्ष करझाई यांच्यासमवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.

First Published on January 13, 2013 4:12 am

Web Title: pakistan is the retreat of terrorist obama
टॅग Retreat,Terrorist