19 September 2020

News Flash

पाकिस्तानी हेर ‘सेजल कपूर’ची ९८ भारतीय अधिकाऱ्यांच्या कंम्प्युटर्समध्ये घुसखोरी

फेसबुकवर 'सेजल कपूर' हे नाव धारण करुन पाकिस्तानचा भारताच्या घातक अस्त्रांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न.

फेसबुकवर ‘सेजल कपूर’ हे नाव धारण करुन पाकिस्तानी हेराने संरक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या ९८ पेक्षा जास्त भारतीय अधिकाऱ्यांच्या कॉम्प्युटर सिस्टिममध्ये घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. २०१५ ते २०१८ या कालावधीत पाकिस्तानी हेराने भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल, निमलष्करी दल तसेच राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील पोलीस अधिकाऱ्यांचे संगणक हॅक केले होते. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

पश्चिम आशियाई देशातील एका सॉफ्टवेअरच्या मदतीने तिने आपले व्हिडिओ आणि फोटो दाखवून संबंधितांना जाळयात ओढले. ब्राह्मोस क्षेपणास्त्राची गोपनीय माहिती लीक करण्याच्या प्रकरणातही तिचा सहभाग होता. ब्राह्मोस हे भारताचे सर्वात अत्याधुनिक आणि घातक क्षेपणास्त्र आहे. भारतीय संगणकांमध्ये घुसखोरी करण्यासाठी तिने ‘व्हिस्पर’ या मॅलवेअरचा वापर केला.

संगणकामधील माहिती मिळवण्यासाठी किंवा नुकसान करण्यासाठी अशा प्रकारच्या सॉफ्टवेअरचा उपयोग केला होता. आयएसआयला ब्राह्मोस क्षेपणास्त्राची गोपनीय माहिती दिल्या प्रकरणी मागच्या वर्षी लष्करी गुप्तचर आणि उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रकल्पाचा इंजिनिअर निशांत अग्रवालला अटक केली. त्यानंतर सेजल कपूरच्या या अकाऊंटचा खुलासा झाला.

सेजलने व्हिस्पर शिवाय ग्रॅव्हिटी रॅट या स्पाय अॅपलिकेशन्सचा सुद्धा वापर केला. सेजलने तिच्या फेसबुक अकाऊंटवर इंग्लंड मँचेस्टरमधल्या ग्रोथ कंपनीची कर्मचारी असल्याचे नमूद केले होते. संगणकातून माहिती मिळवण्यासाठी ती विविध संस्थांच्या अधिकाऱ्यांना संगणकात व्हिस्पर सॉफ्टवेअर इनस्टॉल करण्यासाठी जबरदस्ती करायची. तिच्या चॅटवरुन हे स्पष्ट झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2019 4:14 pm

Web Title: pakistan isi spy sejal kapoor hack indian official computer dmp 82
Next Stories
1 काँग्रेस अध्यक्ष कोण होणार? राहुल गांधींचा खुलासा
2 जगातील सर्वात बुटक्या महिलेनं केली योगासनं
3 वाह धारावी! ‘ताज’लाही टाकलं मागे; पर्यटकांची पहिली पसंती
Just Now!
X