भारतसमवेत र्सवकष चर्चा करण्यासाठी पाकिस्तान उत्सुक असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी स्पष्ट केले. शेजारील राष्ट्रांसमवेत सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करण्यासाठीच आपल्याला जनतेने कौल दिल्याचे त्यांनी सांगितले. काश्मीरसह सर्व मुद्दय़ांवर चर्चेतून मार्ग काढण्याची आपली इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतासमवेत आपण गंभीर चर्चेला तयार असलो तरी, काश्मीरचा त्याच समावेश करावा, असे तुणतुणे त्यांनी वाजवले. नियंत्रणरेषेवर असलेला तणाव ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी मान्य केले. पाकिस्तान संयम ठेवील तसेच जबाबदारीने वागेल, असा दावा त्यांनी तुर्किश मीडिया नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत केला. शेजारील राष्ट्रांसोबत सहकार्याचे आणि स्थिर संबंध प्रस्थापित करण्याचे आपल्या सरकारचे धोरण असल्याचे शरीफ यांनी सांगितले. सरकारचा सामाजिक-आर्थिक विकासाचा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी ते गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विभागाच्या शांततेसाठी भारताबरोबर सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करण्यास दिल्याचे शरीफ यांनी स्पष्ट केले. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समवेत १९९९ मध्ये शांतता चर्चा सुरू करून आम्ही काश्मीर मुद्दय़ावर सर्वमान्य तोडग्याच्या समीप आलो होते असे शरीफ म्हणाले.   मूलतत्त्ववादी मार्गाचा त्याग करण्यास जे तयार आहेत, त्यांच्याशी सरकार चर्चा करेल असे शरीफ यांनी सांगितले.
तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समवेत १९९९ मध्ये शांतता चर्चा सुरू करून आम्ही काश्मीर मुद्दय़ावर सर्वमान्य तोडग्याच्या समीप आलो होते असे शरीफ म्हणाले.