News Flash

१८ भारतीयांसह तीन नौका पाकिस्तानच्या ताब्यात!

पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सीकडून सर क्रीक खाडीजवळ कारवाई झाल्याची माहिती

प्रतिकात्मक छायाचित्र

पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सीने तीन नौकांसह १८ भारतीयांना ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या हद्दीत या नौकांनी प्रवेश केला होता, असे सांगण्यात आले आहे.  या नौकांना सर क्रीक खाडीजवळ ताब्यात घेण्यात आले असल्याची, पाकिस्तानी माध्यमांच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

या अगोदर पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा एजन्सीकडून मासेमारी करणारी भारतीय नौका ‘सुदामा पुरी’वर गोळीबार देखील करण्यात आला होता. यामुळे सातजणांसह ही नौका पाण्यात उलटली होती. यातील सहाजणांना भारतीय तट रक्षक दलाच्या जवानांनी वाचवले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 6:59 pm

Web Title: pakistan maritime security agency has caught 3 indian fishing boats msr 87
Next Stories
1 सुदानमधील कारखान्यात स्फोट, १८ भारतीयांचा मृत्यू
2 ‘एनआरसी’च्या मुद्यावरून आमदारांचे विधानसभेत लोटांगण
3 बुलेट ट्रेन: शिवसेनेच्या भूमिकेमुळे होणार मोदी सरकारची गोची, अ‍ॅबेंना काय उत्तर देणार?
Just Now!
X