11 August 2020

News Flash

पाकिस्तान एफ-१६ विमानांचा वापर दहशतवाद्यांऐवजी भारताविरुद्ध करण्याची भीती

२०२० पर्यंत पाकिस्तानी हवाई दलातील १९० विमाने निवृत्त होणार आहेत.

| April 28, 2016 01:04 pm

F16 fighter jets : आपण पाकिस्तानला भारताशी नव्हे तर दहशतवादी लढ्यात उपयुक्त ठरेल, अशी युद्धसामुग्री देणे अपेक्षित असल्याचे अन्य एका सदस्याने सांगितले.

पाकिस्तानला दहशतवादाचा सामना करण्यासाठी देण्यात येणाऱ्या एफ १६ विमानांचा वापर भारताविरुद्ध केला जाईल, अशी भीती अमेरिकी काँग्रेसच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पाकिस्तानला एफ १६ देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा, अशी मागणी ते ओबामा प्रशासनाला करणार आहेत.
अमेरिकी पाकप्रेम 
पाकिस्तानसोबत एफ १६ विमानांचा व्यवहार करण्याचा निर्णय आणि वेळ शंका उपस्थित करणारा आहे. याशिवाय, भारत-पाक यांच्यातील संबंध अद्यापही ताणलेलेच आहेत. त्यामुळे पाकिस्तानकडून या विमानांचा वापर दहशतवाद्यांपेक्षा भारताविरुद्ध किंवा अन्य प्रादेशिक शक्तींविरुद्ध होण्याची शक्यता असल्याचे अमेरिकन काँग्रेसचे सदस्य मॅट सालमन यांनी सांगितले. आपण पाकिस्तानला भारताशी नव्हे तर दहशतवादी लढ्यात उपयुक्त ठरेल, अशी युद्धसामुग्री देणे अपेक्षित असल्याचे अन्य एका सदस्याने सांगितले. भारतानेही पाकिस्तानला एफ १६ विमाने देण्याच्या निर्णयावर अमेरिकेकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2016 1:04 pm

Web Title: pakistan may use f16 fighter jets against india say us lawmakers
टॅग Pakistan,Us
Next Stories
1 दोन वर्षांच्या मुलाने आईवर झाडली गोळी; आईचा मृत्यू
2 दिल्ली विद्यापीठावर १ मेपासून तिरंगा फडकणार!
3 भारताला काँग्रेसमुक्त करण्याआधी दुष्काळमुक्त करा; संजय राऊतांचा भाजपला टोला
Just Now!
X