22 January 2021

News Flash

पाकिस्तानी लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, चौघांचा मृत्यू

दुर्घटना घडण्याआधी या हेलिकॉप्टरमध्ये एका सैनिकाचा मृतदेह होता.

संग्रहित छायाचित्र (फोटो सौजन्य - रॉयटर्स)

पाकिस्तानात लष्कराचे एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले आहे. शनिवारी हे हेलिकॉप्टर गिलगिट-बाल्टिस्तान भागात कोसळले. चौघांचा या अपघातात मृत्यू झाला, अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली. एका मृत सैनिकाचा मृतदेह लष्करी रुग्णालयाकडे नेत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे हे हेलिकॉप्टर कोसळले. आयएसपीआरच्या स्टेटमेंटमध्ये हे म्हटले आहे.

दोन सैनिकांसह मेजर रँकचा वैमानिक आणि सह वैमानिक या अपघातात ठार झाले. हेलिकॉप्टर ज्या भागात कोसळले, त्या ठिकाणी जमिनीवर कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले. आयएएनएसने हे वृत्त दिले आहे.

दुर्गम भागात ज्या ठिकाणी मानवी वस्ती नाहीय, अशा ठिकाणी हा अपघात झाला असे सूत्रांनी शिन्हुआ वृत्त संस्थेला सांगितले. अपघातानंतर लष्करी टीम्स घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी तिथून पाच मृतदेह ताब्यात घेतले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2020 2:27 pm

Web Title: pakistan military chopper crashes in gilgit baltistan dmp 82
Next Stories
1 “सीबीआयने अजूनही सांगितलं नाही, सुशांतची हत्या की आत्महत्या?”; देशमुख यांचा सवाल
2 ‘एमआयएम’ने वळवला गुजरातकडे मोर्चा; आगामी निवडणुकांसाठी ‘या’ पक्षाशी केली हातमिळवणी
3 ‘या’ राज्यात जातीचे स्टिकर्स असलेल्या गाड्यांवर होणार कारवाई
Just Now!
X