मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रहमान लख्वी याला सार्वजनिक सुरक्षा कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याच्या पंजाब सरकारच्या आदेशाला स्थगिती देऊन लाहोर उच्च न्यायालयाने त्याची सुटका करण्याचा आदेश दिला. या सुटकेबाबत भारताने तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
सरकार लख्वीविरुद्ध काही संवेदनशील अभिलेख सादर करण्यास अपयशी ठरल्यामुळे न्या. मोहम्मद अन्वरुल हक यांनी त्याच्या स्थानबद्धतेला स्थगिती दिली. सुटकेसाठी प्रत्येकी १० लाख रुपयांचा जामीन सादर करण्याची अट न्यायालयाने घातली. विधि अधिकाऱ्याने लख्वीबाबत महत्त्वाची माहिती सादर केली होती, परंतु न्यायालयाने ती स्वीकारली नाही आणि हा पुरावा असमाधानकारक असल्याचा निर्णय दिला, असे  एका अधिकाऱ्याने सांगितले.