06 July 2020

News Flash

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढल्याने पाकिस्तानमध्ये ‘काळा दिवस’

निषेध दर्शवण्यासाठी देशभरात इमारतींच्या छतांवर आणि वाहनांवर काळे झेंडे लावण्यात आले.

| August 16, 2019 03:34 am

प्रतिनिधिक छायाचित्र

इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याबाबत भारताच्या निर्णयाच्या निषेधार्थ भारताचा स्वातंत्र्य दिन पाकिस्ताने गुरुवारी ‘काळा दिवस’ म्हणून पाळला.

निषेध दर्शवण्यासाठी देशभरात इमारतींच्या छतांवर आणि वाहनांवर काळे झेंडे लावण्यात आले. मोठय़ा शहरांमध्ये निषेध मिरवणुका काढण्यात आल्या, तर काश्मीर मुद्दय़ावर पाकिस्तानची भूमिका स्पष्ट करण्यासाठी चर्चासत्रे आयोजित करण्यात आली.

पंतप्रधान इम्रान खान, परराष्ट्र कार्यालय, आयएसपीआरचे संचालक, रेडिओ पाकिस्तान यांच्यासह इतरांच्या ट्विटर हँडलवरील प्रोफाईल चित्रे निषेधार्थ काळ्या रंगाची ठेवण्यात आली होती.

जम्मू- काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून त्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याच्या निषेधार्थ बुधवारी पाकिस्तानने त्याचा स्वातंत्र्य दिन ‘काश्मीर ऐक्य दिवस’ म्हणूनही साजरा केला होता. भारताच्या निर्णयाविरुद्ध पाकिस्तानने त्याचा मित्र चीनसह संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतही दाद मागितली आहे.

दरम्यान, काश्मीर मुद्दय़ावर आंतरराष्ट्रीय समुदायाने मौन बाळगल्याबद्दल पंतप्रधान इम्रान खान यांनी चिंता व्यक्त केली आहे.  याबाबत त्यांनी आश्चर्यही व्यक्त केले. या निर्णयामुळे ‘कट्टरीकरणाची सुरुवात’ आणि ‘हिंसाचाराची चक्रे’ यासारख्या भीषण प्रतिक्रिया मुस्लीम जगतात उमटतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2019 3:34 am

Web Title: pakistan observes black day for kashmir zws 70
Next Stories
1 संरक्षण दल प्रमुखांच्या नियुक्तीचा प्रस्ताव कारगिल युद्धापासूनच
2 न्यायपालिकेत ‘अनुचित’ कृत्यांमध्ये अभूतपूर्व वाढ
3 हाँगकाँगमध्ये स्थिती चिघळल्यास तातडीने उपाय
Just Now!
X