News Flash

भारताचा मोठा विजय! कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेच्या समीक्षेसाठीचं विधेयक पाकिस्तानच्या संसदेत मंजूर

भारताच्या प्रयत्नांचा मोठा विजय

कुलभूषण जाधव

हेरगिरीच्या आरोपांतर्गत पाकिस्तानच्या सैन्य कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेले आणि सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेच्या समीक्षेसाठी पाकिस्तानच्या संसदेत एक विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. भारताच्या प्रयत्नांसाठी हा मोठा विजय मानला जात आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस (समिक्षा आणि पुनर्विचार) अध्यादेश, असं या विधेयकाचं नाव आहे. या विधेयकाला पाकिस्तानच्या संसदेत (नॅशनल असेंब्ली) विरोधकांचा मोठा विरोध असतानाही कायदा आणि न्यायसंबंधी स्थायी समितीने चर्चा करुन मंजुरी दिली.

…तर पाकिस्तानवर आले असते आंतरराष्ट्रीय निर्बंध

संबंधीत समितीच्या चर्चेत भाग घेताना पाकिस्तानचे न्याय आणि कायदा मंत्री फरोग नसीम म्हणाले, “हे विधेयक आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी आणण्यात आले आहे. जर या विधेयकाला नॅशनल असेंब्लीमध्ये मंजुरी मिळाली नसती तर पाकिस्तानला आंतराराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयाचे पालन न करण्याबद्दल प्रतिबंधांचा सामना करावा लागला असता.

कुलभूषण जाधव यांना सन २०१७ मध्ये झाली मृत्यूदंडाची शिक्षा

हेरगिरी आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांखाली ५० वर्षीय माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सैन्य कोर्टानं एप्रिल २०१७ मध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. भारताने पाकिस्तानच्या सैन्य कोर्टाच्या निर्णयाविरोधात आणि जाधव यांना कॉन्सुलेट अॅक्सेस (परराष्ट्रातील कायदेशीर मदत) देण्यास नकार देण्याविरोधात २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती.

आंतराष्ट्रीय कोर्टाकडून निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आदेश

हेग येथे असलेल्या आंतरराष्ट्रीय कोर्टाने जुलै २०१९ मध्ये दिलेल्या निर्णयात पाकिस्तानने जाधव यांच्या शिक्षेबाबत समिक्षा आणि पुनर्विचार करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर कोर्टाने भारताला विनाविलंब जाधव यांच्यापर्यंत कायदेशीर मदत पोहोचवण्याचे आदेश दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 1:46 pm

Web Title: pakistan parliamentary panel approves bill to review kulbhushan jadhavs conviction aau 85
Next Stories
1 भाजपाचा जाहीरनामा : …तर बिहारच्या जनतेला करोना लस मोफत देऊ
2 देशात ६८ लाख नागरिक करोनामुक्त, २४ तासात ७९ हजार ४१५ रुग्णांना डिस्चार्ज
3 चिनी रणगाडे ‘नाग’च्या रेंजमधून नाही सुटणार, क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी
Just Now!
X