News Flash

दहशतवादी हाफिज सईदच्या संस्थांवर पाकिस्तान सरकार टाच आणण्याच्या तयारीत

हाफिज सईदशी संबंधित संस्थांवर लवकरच कारवाई

हाफिज सईद

लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि २६/११ चा मास्टरमाईंड तसेच कुख्यात दहशतवादी हाफिज सईद चालवत असलेल्या संस्थांवर टाच आणण्याची तयारी पाकिस्तान सरकारने सुरु केली आहे. हाफिज सईदशी संबंधित सगळ्या संस्था आणि त्याला पुरवठा करणाऱ्या आर्थिक संघटना यांच्यावर पाकिस्तान सरकारतर्फे कब्जा केला जाणार आहे. अमेरिकेने हाफिज सईद दहशतवादी असल्याचे जाहीर केले आहे. त्याचमुळे पाकिस्तानने ही कारवाई सुरु केली आहे. मिळालेल्या अहवालानुसार हाफिज सईद देणगी देत असलेल्या आणि स्वतः चालवत असलेल्या संस्थांवर कारवाई केली जाणार आहे. हाफिज सईदच्या मालमत्ताही ताब्यात घेण्यात येणार आहेत. ही कारवाई नेमकी कशी करायची याबाबत नुकतीच एक बैठकही पार पडल्याचेही असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. १९ डिसेंबरलाच या संदर्भातली बैठक पार पडली आहे.

अमेरिकेने जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत या दोन संघटना लष्कर-ए-तोयबाशी संलग्न असल्याचे स्पष्ट केले आहे. २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचाही हाफिज सईद हा मास्टरमाईंड आहे. पाकिस्तानने हाफिजला काही दिवस नजरकैदेत ठेवले होते. त्यानंतर त्याला नजरकैदेतून मुक्त करण्यात आले. ज्यामुळेही पाकिस्तानवर सर्व स्तरातून टीकाही झाली. आता पाकिस्तान सरकारने सईदशी संबंधित सर्व संस्थांवर टाच आणण्याचे ठरवले आहे. ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

१९ डिसेंबरला ‘financial action task force इश्यूज’ या नावे एक डॉक्युमेंट जारी करण्यात आले. या डॉक्युमेंटमध्ये हाफिज सईदशी संबंधित संस्थांची नावे आहेत. financial action task force ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था दहशवाद्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीविरोधात काम करते. दहशतवादी संस्थांना मिळणाऱ्या अर्थ पुरवठ्याचे दोर कापले जावेत म्हणून पाकिस्तानला याच संस्थेने सल्ला दिल्याचीही माहिती समजते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2018 6:33 pm

Web Title: pakistan plans takeover of charities run by let chief hafiz saeed
टॅग : Hafiz Saeed
Next Stories
1 तरूणांना विज्ञानाची गोडी लावण्यासाठी प्रादेशिक भाषांचा वापर करा; मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन
2 सर्जिकल स्ट्राईक म्हणजे केंद्र सरकारची नौटंकी ; काँग्रेसची टीका
3 मुझफ्फरनगर दंगल: हिंदू – मुस्लिमांमध्ये समझोता, मागे घेणार खटले
Just Now!
X