27 February 2021

News Flash

पाकिस्तानला भारताची भीती; इम्रान खान म्हणाले, “भारत पुन्हा एकदा…”

पाकिस्ताननंही दिला इशारा

पाकिस्तानला पुन्हा एकदा भारताची भीती सतावत असल्याचं दिसत आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांपासून पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्यापर्यंतच्या प्रत्येकाच्या वक्तव्यांवरून याची प्रचिती येत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका मागोमाग एक ट्वीट करत आंतरराष्ट्रीय समुदायाला भारताच्या सर्जिकल स्ट्राईकबद्दल सतर्क केलं आहे. यापूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी अबुधाबी मध्ये भारत पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करू शकतो असा दावा केला होता. तसंच याबबात आपल्याकडे पुरावेही असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

“जर भारत पाकिस्तानविरोधात बनावट फ्लॅग ऑपरेशन करेल तर पाकिस्तान त्याच पद्धतीनं भारताला प्रत्येक स्तरावर उत्तर देईल हे मी आंतरराष्ट्रीय समुदायाला सांगू इच्छिचतो. कोणतीही चूक करण्यात येऊ नये,” असं ट्वीट इम्रान खान यांनी केलं होतं. “भारतात अंतर्गत वाद वाढत आहेत. आर्थिक मंदी, शेतकऱ्यांचं आदोलन, करोना महासाथीचा अयोग्यरित्या सामना करणं, मी आंतरराष्ट्रीय समुदायाला इशारा देतोय की या वादांवरून लक्ष विचलित करण्यासाठी भारत पाकिस्ताविरोधात खोट्या मोहिमा चालवत आहे,” असंही ते म्हणाले.

इम्रान खान यांनी पाकिस्तानी लष्कराच्या सूरात सूर मिसळून भारतातनं आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केल्याचं म्हटलं. तसंच सीमेवर संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांच्या गाडीवर गोळीबार केला. यावरुन भारताला आंतरराष्ट्रीय नियमांचा किती आदर आहे हे दिसून येत असल्याचंही इम्रान खान म्हणाले.

लष्कराकडून आरोपाचं खंडन

२०२० मध्ये भारतानं सीमेवर ३ हजार वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. यात सामान्य नागरिकांवर निशाणा साधण्यात आला होता. यामध्ये २७६ लोकांचा मृत्यू झाला. त्यात ९२ महिला आणि ६८ बालकांचा समावेश होता, असा आरोपही इम्रान खान यांनी केला. भारतीय लष्करानं यापूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांच्या गाडीवर गोळीबार केल्याच्या या आरोपाचं खंडनही केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2020 10:21 pm

Web Title: pakistan pm imran khan accuses that pm modi is planning to carry out surgical strike on pakistan jud 87
Next Stories
1 शेतकऱ्यांचं उद्या उपोषण; शेतकरी नेत्याचं देशवासीयांना मोठं आवाहन
2 करोनाच्या नव्या स्टेनचा ब्रिटनमध्ये कहर; अनेक देशांच्या विमानसेवा तात्पुरत्या स्थगित
3 निवडणुकांमध्ये भाजपाचा विजय झाल्यास बंगालच्याच मातीतलाच मुख्यमंत्री देणार : अमित शाह
Just Now!
X