News Flash

अल कायदाला प्रशिक्षण पाकिस्तानातच; इम्रान खान यांची कबुली

तीन महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा कबुली

संग्रहित छायाचित्र

दहशतवादी संघटना अल कायदाला प्रशिक्षण पाकिस्तानातच देण्यात आल्याची कबुली खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली. दहशतवादाविरूद्ध हा पाकिस्तानचा सर्वात मोठा कबुलीजबाब आहे. दहशतवादी संघटना अल कायदाने 9/11 सारख्या दहशतवादी कारवाया केल्या आहेत. 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यापूर्वी अल कायदाच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयने प्रशिक्षण दिलं होतं. 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकारने दहशतवादी संघटनांबाबतचं आपलं धोरणं बदललं. परंतु पाकिस्तानी लष्कर तसं करू इच्छित नसल्याची माहिती त्यांनी अमेरिकन थिंक टँक ‘काऊंसिल ऑन फॉरेन रिलेशन्स’मध्ये (सीएफआर) बोलताना दिली.

कार्यक्रमादरम्यान, अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचं एबटाबाद येथील वास्तव्य आणि अमेरिकन नौदलामार्फत मारला गेल्याच्या घटनेचा पाकिस्तान सरकारने तपास का केला नाही? असा सवाल इम्रान खान यांना करण्यात आला. यावर उत्तर देताना आम्ही या घटनेचा तपास केला असल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयने 9/11 पूर्वी अल कायदाला प्रशिक्षण दिलं होतं. यामुळेच त्या संघटनेचे पाकिस्तानशी कायम संबंध जोडले जात होते, असंही ते म्हणाले.

तीन महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा कबुली
अल कायदा आणि त्याचा म्होरक्या ओसामा बिन लादेनवर पाकिस्तानकडून गेल्या तीन महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा कबुलीजबाब देण्यात आला आहे. यापूर्वी इम्रान खान यांनी ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानमध्ये असल्याची आपल्याला माहिती होती, असं म्हटलं होतं. आयएसआयने सीआयएला ओसामा पाकिस्तानात असल्याची माहिती दिली होती. त्याच माहितीच्या आधारावर अमेरिकेने त्याच्यावर कारवाई केली, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 7:35 am

Web Title: pakistan pm imran khan agrees al qaeda training held in pakistan by army america donald trump jud 87
Next Stories
1 भारताचे जीवाश्मरहित इंधनाचे लक्ष्य दुपटीहून अधिक!
2 चिन्मयानंद प्रकरणातील मुलीच्या अटकेला स्थगितीस नकार
3 बालाकोटमधील तळ पुन्हा सक्रिय
Just Now!
X