भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विमानाला आपल्या हवाई क्षेत्रातून उड्डाण करण्यासाठी परवानगी दिली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान खान पहिल्यांदाच श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून यावेळी त्यांचं विमान भारतीय हवाई क्षेत्रातून उड्डाण करणार आहे. २३ फेब्रुवारी रोजी इम्रान खान यांचा श्रीलंका दौरा नियोजित आहे.
विशेष म्हणजे २०१९ मध्ये पाकिस्तानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपलं हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी नाकारली होती. नरेंद्र मोदी अमेरिका आणि सौदी अरेबिया दौऱ्यावर असताना ही परवानगी नाकारण्यात आली होती. काश्मीरमध्ये मानवाधिकार हक्कांचं उल्लंघन होत असल्याचं सांगत पाकिस्तानने भारताला नकार दिला होता.
India permits Imran Khan’s aircraft to use its airspace for travel to Sri Lanka
Read @ANI Story | https://t.co/tY099czifU pic.twitter.com/7w0YHlhEi9
— ANI Digital (@ani_digital) February 23, 2021
व्हीव्हीआयपी विमानाला परवानगी नाकारण्याचा मुद्दा भारताने आंतरराष्ट्रीय नागरी विमानचालन संस्थेकडे उपस्थित केला होता. सामान्य परिस्थितीत व्हीव्हीआयपी विमानांना उड्डाणासाठी देशांकडून परवानगी दिली जाते. मात्र पाकिस्तानने परवानगी नाकारणं नियमाचं उल्लंघन असल्याचा आक्षेप भारताने घेतला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 23, 2021 10:03 am