News Flash

काश्मीर, दिल्लीवर हल्ल्याचा पाकिस्तानने बनवला ‘प्लान’, RAW चा रिपोर्ट

गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार पाकिस्तान अफगाणिस्तानातून दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये आणण्याचे प्लानिंग करत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार पाकिस्तान अफगाणिस्तानातून दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये आणण्याचे प्लानिंग करत आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील लाँच पॅडसवरुन या दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये घुसवण्याची योजना आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तान भारतात घातपात घडवण्याच्या योजना आखत आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

नवी दिल्लीत घातपाती कारवाया घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने अफगाणिस्तानात दहशतवाद्यांना तयार केल्याची दुसरी माहिती आहे. काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना हे दहशतवादी लक्ष्य करु शकतात. काश्मीरमधील राजकीय नेत्यांनाही हे दहशतवादी टार्गेट करु शकतात अशी गुप्तचरांची माहिती आहे.

‘रॉ’ च्या रिपोर्टनुसार जैश-ए-मोहम्मदने जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांना लक्ष्य करण्याच कट रचला आहे. पाकिस्तानात बहावलपूरमध्ये मारकाज उस्मान-ओ-अली येथे १९ ऑगस्टला बैठक झाल्याची माहिती आहे. जैशचा म्होरक्या मसूद अझहरचा भाऊ रौफ अझगरने या बैठकीचे नेतृत्व केले अशी सूत्रांची माहिती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 7:51 pm

Web Title: pakistan preparing afghan terrorists for attacks in kashmir new delhi dmp 82
Next Stories
1 चांद्रयान 2 ने पाठवलेला चंद्राचा पहिला फोटो पाहिलात?
2 आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी सरकारने असामान्य पावलं उचलण्याची गरज – निती आयोग
3 फ्रान्सला जाण्यासाठी पंतप्रधान मोदींनी केला पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर
Just Now!
X