News Flash

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दिल्या होळीच्या शुभेच्छा, म्हणाले…

त्यांनी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत

देशभरात होळीचा सण साजरा होत असून, सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. सोशल मीडियासह होळीच्या शुभेच्छा सुरू झाल्या आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही पाकिस्तानातील हिंदू समुदायातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

गाव खेड्यांपासून ते शहरापर्यंत होळीची तयारी सुरू आहे. सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या जात आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. इम्रान खान यांनी एक ट्विट केलं असून, त्यात आनंदी व शांतीपूर्ण होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “रंगाचा उत्सव असलेल्या होळीच्या हिंदू समुदायाला खूप खूप शुभेच्छा,” असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

इम्रान खान यांच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहींनी ट्रोल केलं आहे.

पाकिस्तानातील अल्पसंख्याकांचा मुद्दा नेहमी चर्चेत-

मुस्लीम राष्ट्र असलेल्या पाकिस्तानमध्ये हिंदूसह इतर धर्मातील अल्पसंख्याकांचा मुद्दा नेहमी चर्चेत असतो. बहुसंख्याकाकडून अल्पसंख्याकावर अत्याचार केले जात असल्याचं माध्यमातून समोर आलं आहे. विशेष हिंदू समुदायातील स्त्रियांच्या जबरदस्ती धर्मांतर केल्याच्या घटना सातत्यानं घडत असतात. त्यावरूनही इम्रान खान यांना काहींनी सवाल विचारला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 9:45 am

Web Title: pakistan prime minister greeting to hindu community people on occasion of holi bmh 90
टॅग : Holi,Holi Festival
Next Stories
1 सीआरपीएफच्या जवानाची आत्महत्या; स्वतःवरच झाडली गोळी
2 Coronavirus : पंतप्रधान मोदींचा बांगलादेश दौरा रद्द
3 राणा कपूर यांना अटक
Just Now!
X